भारतात अनेक ठिकाणे प्रवासासाठी सर्वोत्तम मानली जातात. यात गोवा सर्वात पर्यटकाच्या सर्वांत पसंतीच्या ठिकाणांपैकी एक आहे. हनिमून असो, ख्रिसमस असो किंवा नवीन वर्षाचे सेलिब्रेशन, गोवा प्रत्येक गोष्टीसाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. गोव्यातील नाईटलाइफ जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील लोक गोव्याला न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी येतात. पंरतु गेल्या आठवड्यात गोव्यात एका क्लबमध्ये धक्कादायक घटना घडली. क्लबच्या किचनमध्ये झालेल्या सिलिंजर स्फोटात अनेक लोक मृत्यू झाला. यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. परंतु काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही गोव्यातील नाईटलाइफचा व्यवस्थित आनंद घेऊ शकता.
advertisement
बाहेर पडण्याचा रस्ता शोधून ठेवा
गोव्यात अनेक क्लब आहेत. रात्रीच्या वेळी येथे पार्ट्या होतात आणि तिथे प्रचंड गर्दी होते. तुम्ही नव्या वर्षायासाठी गोव्यात जाणार असाल आणि क्लबमध्ये पार्टी एन्जॉय करणार असाल तर क्लबमध्ये जातानाच सर्वप्रथम बाहेर पडण्याचा मार्ग कुठे आहे हे तपासून घ्या. प्रवेशद्वाराव्यतिरिक्त किमान दोन आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग लक्षात ठेवा. कारण गर्दी किंवा चेंगराचेंगरीची घटना घडल्यास तुम्हाला सर्वात सुरक्षित आणि जवळचा मार्ग माहिती असणे आवश्यक असते.
लाईव्ह लोकेशन शेअर करा
तुम्ही क्लबमध्ये जात असाल तेव्हा तुमचे लाईव्ह लोकेशन तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. यामुळे त्यांना तुम्ही कुठे आहात आणि किती वेळ तिथे आहात हे कळेल. तसेच क्लब किंवा ठिकाण सोडण्यापूर्वी तुम्ही तिथून निघाल्याचे देखील त्यांना कळवा. यामुळे तुमच्यासोबत काही संकटात अडकलात तर तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेल.
आजूबाजूला काळीपूर्वक लक्ष ठेवा
जेव्हा तुम्ही क्लबमध्ये जाता तेव्हा तेथील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा. तुम्हाला कोणतीही संशयास्पद बॅग किंवा हालचाल दिसली तर ताबडतोब ती जागा सोडा किंवा व्यवस्थापकाला कळवा. जर गर्दी अचानक खूप जास्त झाली किंवा चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली तर शांतपणे ती जागा सोडण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या पेयाची काळजी घ्या
क्लबमध्ये कधीही तुमचे ड्रिंक सोडून जाऊ नका. विशेषतः डान्स फ्लोअरवर जाताना ड्रिंक संपवा किंवा सोबत घेऊन जा. अनोळखी लोकांकडून पेये स्वीकारू नका. कधीकधी पेयांमध्ये ड्रग्ज मिसळले जातात. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही क्लबमध्ये जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.
स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे
गोवा हे अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे. येथील पोलिस देखील कायम सतर्क असतात. त्यामुळे इथे शक्यतो अनुचित प्रकार घडत नाही. परंतु आपली काळजी आपण घेणे हे प्रत्येकाचे काम असते. त्यामुळे तुमचा प्रवास आनंददायी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी कायम येथे दिल्या टिप्स लक्षात ठेवा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
