एसीमध्ये बसलेले असताना आपल्या शरीराचं तापमान कमी झालेलं असतं. तेव्हा उन्हामध्ये जाण्यापूर्वी आपल्या शरीराचं तापमान नॉर्मल हाऊ देणं गरजेचं असतं. अन्यथा आपण आजारी पडण्याचा धोका वाढतो. एसीमधून ठेवत उन्हाळा गेल्यावर नेमकं काय होऊ शकतं, याबद्दल या लेखामध्ये माहिती दिली गेली आहे.
एसीतून थेट उन्हात गेल्यास होऊ शकतात हे दुष्परिणाम
advertisement
उन्हाळ्यात एसीमधून उठून थेट उष्ण वातावरणात जाणं टाळावं, असा डॉक्टरांचा सल्ला आहे. डॉक्टरांच्या मते, तापमानात तीव्र चढ-उतार होणाऱ्या ठिकाणी राहणं टाळावं. म्हणजेच 16 अंश सेल्सिअस तापमानात एसी ऑफिसमध्ये तुम्ही बसलेले असाल तर अचानक उठून बाहेरच्या 43 अंश सेल्सिअस तापमानात जाऊ नका. हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. यामुळे शरीरात अचानक उष्णता वाढू शकते. यामुळे शरीराला तापमानातील चढ उत्तर सहन न झाल्यास उष्माघात होऊ शकतो.
उष्माघात झाल्यास तुम्हाला मळमळ, चक्कर येणे, स्नायूंमध्ये पेटके येणे आणि मानसिक गोंधळ या त्रासाचं सामना करावा लागू शकतो. म्हणून उन्हाळयात एसीमधून थेट उन्हात जाऊ नका. हे तुमच्या आरोग्यासाठी कायम लक्षात ठेवा.
उष्माघाताची इतरही अनेक कारणं आहेत. उष्माघातापासून वाचण्यासाठी उन्हात डोकं जड वाटू शकतं किंवा असह्य वेदना होऊ शकतात. अशावेळी डोक्यावर ओला कपडा ठेवून टोपी घालावी. स्नायू दुखत असल्यास उन्हात बाहेर जाणे टाळावे आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. उष्माघातामुळे ताप भरल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शरीराचं तापमान 106 अंश असल्यास घसा, काख आणि मांड्यांवर बर्फाच्या पिशव्या ठेवाव्यात. उन्हाळयात नाडीचे ठोके आणि रक्तदाब खूप कमी झाल्यासारखे वाटले, तर फळांचा रस किंवा उसाचा रस प्यावा. अतिसार, उलट्या आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी हलका आहार घ्यावा. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात बाहेर जाणे टाळावे. सुती कपडे घालावेत. लांबचा प्रवास असल्यास 15 मिनिटे सावलीत उभे राहावे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी आणि इतर द्रवपदार्थ प्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
