व्यायामापूर्वी तयारी करा
स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी पूर्ण तयारी करणे आवश्यक आहे, खासकरून सुरुवातीच्या टप्प्यात आठवड्यातून एक ते तीन दिवस स्नायूंचे (muscles) व्यायाम करा.वॉर्म-अपसाठी (warm-up) पाच ते दहा मिनिटे हलका कार्डिओ व्यायाम करा आणि थेट जड वजन उचलण्याऐवजी, थोडे कमी वजनापासून सुरुवात करा.
वेगवेगळ्या स्नायूंसाठी व्यायाम करण्यासाठी, एक किंवा दोन व्यायामांनी सुरुवात करा आणि ते आठ वेळा पुन्हा करा. जेव्हा तुम्ही हे व्यायाम सहज करू शकाल, तेव्हा त्यांची रिपीटेशन 15 ते 16 वेळा करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही वजन वाढवाल, तेव्हा रिपीटेशन कमी करा.
advertisement
सुरुवातीच्या टप्प्यात, सतत व्यायाम करण्याऐवजी तुमच्या शरीराला कमीत कमी एक दिवस विश्रांती द्या. हळूहळू, प्रत्येक आठवड्यात व्यायामाची रिपीटेशन एकदा वाढवा किंवा थोडे अधिक वजन वाढवा. हे असे साधारण सहा आठवडे केल्यानंतर, तुम्ही सहजपणे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे हेवी व्यायाम सुरू करू शकाल.
स्ट्रेंथ ट्रेनिंगचे व्यायाम कसे निवडावे?
जर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या व्यायामांबद्दल जास्त माहिती नसेल, तर तुम्ही ट्रेनरची मदत घेणे अधिक चांगले होईल. शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी काही महत्त्वाचे स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम खालीलप्रमाणे आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात, फक्त एक किंवा दोन व्यायाम निवडा.
- छातीसाठी : बेंच प्रेस, चेस्ट प्रेस मशीन, पुश-अप्स, पेक डेक मशीन.
- पाठीसाठी : सीटेड रो मशीन, बॅक एक्सटेंशन, पुलडाउन्स.
- खांद्यांसाठी : ओव्हरहेड प्रेस, लॅटरल राइज, लॅट पुलआउट्स.
- बायसेप्ससाठी : बायसेप्स कर्ल, हॅमर कर्ल, कॉन्सन्ट्रेशन कर्ल.
- ट्रायसेप्ससाठी : ट्रायसेप्स एक्सटेंशन, डिप्स, किकबॅक्स.
- लोअर बॅकसाठी : स्क्वॉट, लंज, लेग प्रेस मशीन, डेडलिफ्ट्स, काफ राइज.
- एब्ससाठी : क्रंचेस, रिव्हर्स क्रंच, ऑब्लिक ट्विस्ट, पेल्विक टिल्ट.
हे ही वाचा : Yoga Benefits : मानसिक शांती ते शारीरिक तंदुरुस्ती, योगा आणि ध्यानधारणेचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीये?
हे ही वाचा : सांधेदुखीने हैराण आहात? रोज करा फक्त 10 मिनिटे स्ट्रेचिंग, शरीर होईल मजबूत अन् लवचिक!