लखनऊ, 12 डिसेंबर : आता बऱ्यापैकी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारात हिवाळ्यातली फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. खरंतर तज्ज्ञदेखील आहारात हंगामी फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा, असा सल्ला देतात. त्यामुळे आपण सुरू असलेल्या ऋतूत उत्पादित होणारी फळं आणि भाज्या प्रामुख्याने खायला हव्या.
डॉ. सुनीता सक्सेना सांगतात की, ज्यांच्या आहारात हंगामी फळं आणि भाज्यांचा समावेश असतो, त्यांचं जीवन दीर्घायुष्यी असतं. कारण अशा फळांमध्ये, भाज्यांमध्ये शरिराला त्या त्या विशिष्ट कालावधीत आवश्यक असणारी पोषक तत्त्व असतात. हिवाळ्यात तर शरिरातलं मेटाबॉलिसमचं प्रमाण बरंच कमी होतं. त्यामुळे हंगामी फळं, भाज्याच खाव्या, ज्यांमुळे आरोग्याला आवश्यक ती पोषक तत्त्व मिळतात.
advertisement
शरीराला प्रोटीनसाठी काय खावं? कोणत्या पदार्थांनी होईल फायदा पाहा PHOTOS
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक भाजी आरोग्यासाठी उपयुक्त असते. बटाटा, टोमॅटोचा समावेश तर आपल्या स्वयंपाकात वर्षभर असतो. परंतु हिवाळ्यात विशेषतः पालक, ब्रोकोली, कोबी, गाजर, इत्यादी भाज्या प्रामुख्याने खायला हव्या. हिरव्या पालेभाज्यांमध्ये सर्वात पौष्टिक असते पालक. ज्यात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. विशेषतः महिलांसाठी ही भाजी फायदेशीर ठरते. या भाजीमुळे शरिरातील अ जीवनसत्त्व, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्त्वांची कमतरता भरून निघते.
सकाळी घरातून नाश्ता न करता बाहेर पडतायत? आधी 'ही' सवय मोडा; नाहीतर होवू शकतात विपरीत परिणाम Video
हिवाळ्यात गाजरसुद्धा आरोग्याला विशेष उपयुक्त असतात. यात असलेले अ, ब, ब2, ब3, क, के जीवनसत्त्व आणि बीटा कॅरेटिन तत्त्व हृदयाचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास फायदेशीर ठरतात. शिवाय डोळ्यांची दृष्टीही तीक्ष्ण होते. त्याचबरोबर शरिरातली रक्ताची कमतरता भरून काढून गाजर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं.
डॉक्टर सांगतात की, पूर्वी वृद्ध व्यक्तींमध्ये जे आजार पाहायला मिळायचे ते आता तरुणांमध्ये आढळतात. त्यामुळे प्रत्येकाने सकस आहार घेणं अनिवार्य आहे. आपण जेवणात गाजर, टोमॅटो, ब्रोकोली आणि पालेभाज्यांचा प्रामुख्याने समावेश करावा. ज्यामुळे सी जीवनसत्त्व, अँटीऑक्सिडंट, सेलेनियम, लायकोपीन, इत्यादी पोषक तत्त्व मिळतील आणि कर्करोगासह हृदय रोगांपासून आपलं संरक्षण होईल.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g