हिरवी मिरचीचे पौष्टिक फायदे
हिरव्या मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि फायबर असते. हे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते, डोळ्यांची दृष्टी वाढवते आणि हृदयाचे कार्य योग्य ठेवते. त्यात पाणीही मुबलक असते आणि कॅलरीज जवळपास नसतात.
लाल मिरचीपेक्षा जास्त फायदे
आपण सहसा जेवणात लाल मिरची वापरतो, पण खरी ताकद हिरवी मिरचीत असते. लाल मिरची ही हरवी मिरचीच पिकून आणि वाळून बनते. मात्र, वाळल्यानंतर तिच्या पौष्टिक घटकांचा आणि ताकदीचा मोठा भाग कमी होतो. त्यामुळे हिरवी मिरची जास्त फायद्याची ठरते.
advertisement
हिरवी मिरची कशी खावी?
हिरवी मिरची कच्ची खाणे सर्वात जास्त फायद्याचे मानले जाते. ती भाजीमध्ये, चटणीत, लोणच्यात किंवा सॅलडमध्येही खाल्ली जाते. मात्र, ती मर्यादित प्रमाणातच खावी. ज्यांना पित्त दोष, मूत्राशयाच्या समस्या किंवा ब्लीडिंग डिसऑर्डर आहेत त्यांनी हिरवी मिरची टाळावी.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
हिरवी मिरचीमध्ये फायबर मुबलक असते आणि ती पचन तसेच मेटाबॉलिझम वेगाने चालवते. यामुळे शरीरातील चरबी कमी होते आणि वजन घटण्यास मदत होते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
हिरवी मिरचीत बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. शरीरात गेल्यानंतर बीटा कॅरोटीन हे जीवनसत्त्व ए मध्ये बदलते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या पेशींचे नुकसान टाळतात.
डायबिटीजसाठी उपयुक्त
ज्यांना मधुमेह आहे त्यांनी नियमितपणे हिरवी मिरची खाल्ल्यास इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
त्वचा आणि हृदयासाठी फायद्याची
हिरवी मिरचीत जीवनसत्त्व सी आणि ई असते, जे त्वचेसाठी चांगले असते. तसेच त्यात असलेले बीटा कॅरोटीन हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.