याबद्दल आपल्या एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथे प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, केळीच्या विविध अवस्था आणि त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. चला पाहूया तुमच्यासाठी कोणती स्थिती जास्त फायदेशीर..
हिरवी केळी किंवा कच्ची केळी
कच्च्या आणि हिरव्या केळीमध्ये रेझिस्टंट स्टार्च असतो. हे एक प्रकारचे फायबर आहे, जे तुमच्या आतड्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. डॉ. सेठी सांगतात की, यात फायबर जास्त आणि साखर खूप कमी असते. अंदाजे 100 ग्रॅम हिरव्या केळीमध्ये सुमारे 10 ग्रॅम साखर असते. आतड्यांचे आरोग्य आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ही केळी उत्कृष्ट आहेत. मात्र त्यांची चव थोडी कडू असू शकते आणि काही लोकांसाठी ती पचायला जड वाटू शकतात.
advertisement
फिकट हिरवी केळी
डॉ. सेठी यांच्या मते, केळी खाण्याची सर्वात उत्तम वेळ ती आहे, जेव्हा ते फिकट हिरवे असते. म्हणजेच ती पूर्णपणे कच्चीही नसते आणि पूर्णपणे पिकलेलीही नसते. या स्थितीत केळीमध्ये फायबर आणि साखरेचा समतोल अगदी योग्य असतो. 100 ग्रॅम फिकट हिरव्या केळीमध्ये सुमारे 2.5 ग्रॅम फायबर असते आणि त्यात पोटॅशियमचे प्रमाणही वाढलेले असते. ही केळी पोटासाठी चांगली असते, ऊर्जा देते आणि रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करते. म्हणजेच रोज खाण्यासाठी ही सर्वात आरोग्यदायी केळी आहेत.
पूर्णपणे पिवळी केळी
जेव्हा केळी पूर्णपणे पिवळी होते, तेव्हा त्यातील स्टार्च तुटून साखरेत रूपांतरित होतो. यामुळे हे सहज पचणारे आणि ऊर्जा देणारे स्नॅक बनते. डॉ. सेठी यांच्या मते, यात रेझिस्टंट स्टार्च कमी असतो, पण व्हिटॅमिन सी, बी5 आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात. त्यामुळे वर्कआउट करण्यापूर्वी किंवा थकल्यानंतर त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
तपकिरी डाग असलेली केळी
केळीवर तपकिरी डाग दिसल्यास त्यांना फेकून देऊ नका. या अवस्थेत केळी खूप गोड आणि मुलायम होते. तुम्ही त्यांचा उपयोग स्मूदी, शेक किंवा बनाना ब्रेड बनवण्यासाठी करू शकता. डॉ. सेठी सांगतात की, या वेळेस केळीमध्ये सुमारे 17 ग्रॅम साखर असते. यात फायबर थोडे कमी असते, पण अँटिऑक्सिडंट्स सर्वात जास्त असतात. चव आणि अँटिऑक्सिडंट्ससाठी ही अवस्था चांगली असली तरी रक्तातील साखर वाढणाऱ्यांसाठी ती योग्य नाही.
यापैकी सरावात फायदेशीर पर्याय कोणता?
प्रत्येक केळी तिच्या तिच्या पद्धतीने फायदेशीर आहे, परंतु जर तुम्हाला फायबर, पोषक तत्वे आणि नैसर्गिक गोडवा यांचा योग्य समतोल हवा असेल, तर फिकट हिरवी केळी सर्वात सर्वोत्तम आहेत. ही केळी तुमची आतडे निरोगी ठेवतात, रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि दिवसभर तुम्हाला स्थिर ऊर्जा देतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
