आपल्या केसांचा रंग 'मेलॅनिन' नावाच्या रंगद्रव्यामुळे असतो, जो 'मेलॅनोसाइट' पेशींद्वारे तयार होतो. आपल्या शरीरातील या पेशी मेलेनिन तयार करणं थांबवतात तेव्हा आपले केस त्यांचा नैसर्गिक रंग गमावू लागतात आणि अकाली राखाडी होतात.
केस अकाली पांढरे होणं हे पौष्टिक कमतरता आणि अनुवांशिक घटकांमुळे असू शकतं. म्हणून, पहिलं पाऊल म्हणजे तुमच्या आहाराकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
advertisement
केस काळे करण्यासाठी रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर केल्यानं केवळ केसांनाच नाही तर तुमच्या टाळूलाही नुकसान होऊ शकतं. पांढरे केस काळे करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहूयात. आवळा आणि शिकाकाई, काळा चहा, नारळ तेल आणि लिंबाचा रस या उपायांनी केस काळे होण्यास मदत होऊ शकते.
Hip Exercises : ज्येष्ठ नागरिकांसाठी फिटनेस टिप्स, खुर्चीवर बसून करा सोपे व्यायाम
- आवळा आणि शिकाकाई - पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा आणि शिकाकाई अत्यंत परिणामकारक मानले जातात. आवळ्यात भरपूर पौष्टिक घटक असतात. आवळा पावडर आणि शिकाकाई पावडर समान प्रमाणात मिसळून पेस्ट बनवा आणि केसांना लावा. थोड्या वेळानं सौम्य शाम्पूनं धुवा. यामुळे केस काळे होण्यास मदत होऊ शकते.
- काळा चहा - प्रत्येक स्वयंपाकघरात चहा सहज उपलब्ध असतो. चहाच्या पानांनी चहा तर मस्तच लागतो पण राखाडी केस काळे करण्यास देखील मदत होते. एक कप पाण्यात काही चमचे ब्लॅक टीची पानं उकळा, ते थंड होऊ द्या आणि या पाण्यानं तुमचे केस धुवा. यामुळे तुमचे केस काळे होतीलच पण ते चमकदारही होतील.
Dandruff : भुवयांमधे कोंडा का होतो ? कोंडा घालवण्यासाठी काय करायचं ?
- नारळ तेल आणि लिंबाचा रस - नारळ तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. केस पांढरे होणं टाळायचं असतील तर तुम्ही नारळ तेल वापरू शकता. नारळाचं तेल लिंबाच्या रसात मिसळा आणि केसांना मसाज करा. काही तासांनी केस धुवा. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा करू शकता.
