पाकिस्तानी त्वचारोग तज्ञ डॉ. जाकिया नूर यांच्या मते, केस सतत जोरात ओढून बांधले गेले किंवा घट्ट हेअरस्टाईल्स दीर्घकाळ ठेवली तर, मुळांवर ताण येतो. या ताणामुळे केसांच्या फॉलिकल्सवर दाब निर्माण होतो आणि हळूहळू त्या भागात केस गळू लागतात. सुरुवातीला हे छोटे पॅचेसप्रमाणे दिसते, पण दुर्लक्ष केल्यास पुढे टक्कल पडण्याची समस्या वाढू शकते.
advertisement
कोणत्या चुकीच्या हेअरस्टाईल्सने होते केसगळती?
काही हेअर स्टाईल जसे की, अतिशय टाइट पोनीटेल, घट्ट बन किंवा जुडा बांधणे, क्लचर्सने टाईट केस बांधणे, ओले केस बांधणे, वारंवार स्टायलिंग.. या सगळ्यामुळे केसांच्या मुळांवर ताण येतो, रक्तपुरवठा कमी होतो आणि फॉलिकल्स कमकुवत होतात.
या हेअरस्टाईल्स ट्राय करा..
लूज बन : ही हेअरस्टाईल सर्वात सुरक्षित आहे. मोठ्या दातांच्या कंगव्याने हलक्या हाताने केस विंचरा, सिल्की स्क्रंचीचा वापर करा, बन करताना केस घट्ट वळवू नका, एंड्स हलक्या हाताने स्क्रंचीत अडकवा आणि बॅन बांधा. मुळे केसांवरील ताण कमी होते आणि फॉलिकल्स सुरक्षित राहतात.
दोन लूज वेण्या : आपण पूर्वी शाळेत असताताना दोन वेण्या घालत होत. त्या आपल्याला आवडत नव्हत्या पण आपल्या केसांसाठी ते फायद्याचे होते. कारण यामुळे केस ओढले जात नाहीत, ताण समान वाटतो, पुढील भागातील केस गळण्याची शक्यता कमी होते, फक्त वेण्या खूप घट्ट नसाव्यात.
सैल एक वेणी : रात्री झोपताना असो किंवा जमत असल्यास दिवसही तुम्ही सैल वेणी घालू शकता. यामध्ये केस व्यवस्थित बसतात, टाळूवर ताण येत नाही, ब्रेकेज कमी होते. ही वेणी कोणत्याही वयातील मुलींसाठी योग्य ठरते आणि सुंदरही दिसते.
लो पोनीटेल : वेणी न घालता फक्त केस एकत्र बांधायचे असतील तर हाय पोनीटेलपेक्षा लो पोनीटेल करा. कारण खूप उंच आणि घट्ट केस बांधल्याने केसांचे जास्त नुकसान होते. दिवसभरात फक्त 6-7 तास हि हेअरस्टाईल ठेवा, त्यानंतर लूज बन करा. यामुळे केसांवरील ताण 70% कमी होतो.
केसांवर सिरम लावणेही आवश्यक
केस ओढले जाण्यापासून वाचवण्यासाठी, केस मऊ आणि मॅनेजेबल बनवण्यासाठी केसांना सीरम नक्की लावावा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. सिरम कधीही स्कॅल्पवर लावू नये. सिरम लावल्याने केस सुटसुटीत राहतात आणि तुटण्याची शक्यता कमी होते.
चुकीचे हेअरस्टाईल्स तुमच्या केसांवर थेट परिणाम करू शकतात. सतत टाइट हेअरस्टाईल्स करणे म्हणजे केसांना कायमस्वरूपी हानी करणे. योग्य हेअरस्टाईल्स, लूज वेण्या, लो पोनीटेल आणि सीरमचा वापर. हे सर्व मिळून ट्रॅक्शन अॅलोपेशिया टाळण्यास मदत करतात. केस वाचवण्यासाठी त्यांना थोडी मोकळीक देणे हाच सर्वोत्तम उपचार आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
