धनत्रयोदशी हा दीपावलीच्या सुरुवातीचा दिवस आहे. यंदा 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. आता सण म्हटलं की शुभेच्छा आल्याच. सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी तुम्हीही अशाच शुभेच्छा शोधत असाल. तर आम्ही तुमच्यासाठी व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक सगळ्या सोशल मीडियावर पाठवता येतील आणि स्टेटस, स्टोरीवर ठेवता येतील असे धनत्रयोदशी शुभेच्छा मेसेज.
advertisement
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!
धनत्रयोदशीचा हा दिन, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन,
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी, तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची..
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या आज दाही दिशा..
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी आपणास,
मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
धनत्रयोदशीने होते सुरुवात,
आज या दीपपर्वाची..
समस्त मित्रपरिवारांना,
ही दिवाळी जावो सुख-सम्रुद्धीची,
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!
आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी,
जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्वतरीचा हा सण,
आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !