कोजागिरी पौर्णिमा हा आनंद, श्रद्धा आणि चंद्राच्या मनोहारी प्रकाशाने न्हालेल्या रात्रीचा सण आहे. या खास प्रसंगी आपल्या प्रियजनांना प्रेमळ शुभेच्छा देऊन त्यांना सुख, समृद्धी, आणि शांततेचा आशीर्वाद देणं ही एक सुंदर परंपरा आहे. आम्ही तुमच्यासाठी खास कोजागिरी पौर्णिमेच्या 2024 चे मराठी कोट्स, ज्यामुळे तुमच्या शुभेच्छा अधिक हृदयस्पर्शी आणि खास होतील.
advertisement
तोच नेहमीचा चंद्रमा नभी,
अन चांदणी माझ्या दारी उभी,
कोजागिरीला वेगळेच जग पृथ्वीवरी,
जसे गगनाची दुनिया पृथ्वीवरी उभी…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
----------------------------------
मंद गतीने पाऊलं उचलत,
चांदण्याचा प्रवास सुरू झाला,
दडला होता ढगात हा चंद्र,
पदरात जसा मुख चंद्र लपलेला…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
-------------------------------------
साखरेचा गोडवा केशरी दुधात,
विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,
रेंगाळत राहो अंतर्मनात,
स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
-------------------------------
प्रत्येकाचा जोडीदार,
त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा आणि कधी कधी वाघोबा होतो,
निराशेचे ढग हटवून,
झाले गेले विसरून जाऊ,
आजच्या रात्री शुभ्र चांदण्यात,
एकमेकांचे होऊन जाऊ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
--------------------------------------
दूध हे केशरी,
कोजागिरीचे खास,
वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात,
परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात
असाच वाढावा गोडवा आणि
आयुष्यभर मिळावी आपली साथ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
----------------------------
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!