TRENDING:

Happy Vasubaras Wishes : स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला; Instagram Story, Whatsapp Status मधून अशा द्या वसुबारस शुभेच्छा

Last Updated:

Vasubaras Wishes 2024 in Marathi: वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. हा गायीच्या पूजेला समर्पित दिवस. या दिवसासाठी खास व्हॉट्सअॅप स्टेटस, इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवता येतील असे वसुबारस शुभेच्छा संदेश आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Happy Vasubaras 2025 Wishes In Marathi : वसुबारसचा दिवस आला की दिवाळीची सुरुवात झाली असं म्हणतात. वसुबारस हा गायीच्या पूजेला समर्पित दिवस आहे. यावर्षी सोमवारी, 17 ऑक्टोबर शुक्रवारी वसुबारसचा सण साजरा केला जाणार आहे. आता कोणताही सण म्हटलं की शुभेच्छा मेसेज आणि सोशल मीडिया स्टेसस आलेच. अशाच शुभेच्छा म्हणून पाठवता येतील, व्हॉट्सअॅप स्टेटस, इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवता येतील असे वसुबारस शुभेच्छा संदेश आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.
News18
News18
advertisement

हिंदू पौराणिक कथांमध्ये, गायीला पवित्र आणि देवाचा अवतार मानलं जातं. गायी आणि वासरांना मान देण्यासाठी वसुबारस सण साजरा करतात. सर्व देवी-देवतांना आणि पूर्वजांना एकत्रितपणे प्रसन्न करायचं असेल तर गौ भक्ती-गौसेवेपेक्षा मोठा कोणताही विधी नाही. गाईला फक्त एक घास खाऊ घाला, तो आपोआप सर्व देवतांपर्यंत पोहोचतो, अशीदेखील मान्यता आहे. त्यामुळे वसुबारसच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी गायीची पूजा करतात.

advertisement

आज वसुबारस

दिवाळीचा पहिला दिवस

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना

सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची

वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची

advertisement

दिवाळीचा पहिला दिवस

वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...

गाय आणि वासराच्या अंगी असणारी

वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी

हे सर्व आपणास लाभो.

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा!

advertisement

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

गायी आणि वासरांची

सेवा आणि संरक्षण करा

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

advertisement

जिच्या सेवेने सर्व संकट दूर होतात

अशा गाय मातेमध्ये आहे सर्व देवांचा अंश

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे

हीच देवाकडे प्रार्थना...

वसुबारस या शब्दातील वसू

म्हणजे धन त्यासाठी

असलेली बारस म्हणजे द्वादशी

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी

असणारे सेंद्रिय नाते सुदृढ

करणारा वसुबारस हा सण.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! तुमच्या फोटोचा कुणी गैरवापर तर करत नाही ना? नवा Scam समोर
सर्व पहा

या सणानिमित्ताने शुभेच्छा

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Vasubaras Wishes : स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला; Instagram Story, Whatsapp Status मधून अशा द्या वसुबारस शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल