TRENDING:

Food Food : दुधीच्या सालाची चटणी बनवण्याची सोपी कृती, चविष्ट आणि पौष्टिक पर्याय, नक्की करुन पाहा

Last Updated:

दुधी भोपळ्याच्या सालांचा उपयोग करुन केलेली ही चटणी स्वादिष्ट होते, जी खाणाऱ्यांना बोटे चाटायला लावेल. ही चटणी केवळ स्वादिष्टच नाही, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीरसुद्धा आहे. चटणी बनवण्याची सोपी पद्धत शिकूया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दुधीची भाजी घरोघरी केली जाते. भाजी करताना दुधी भोपळ्याच्या सालांचं तुम्ही काय करता ? दुधी भोपळ्याच्या साली न टाकता त्याची मस्त चटणी बनवता येते.
News18
News18
advertisement

दुधी भोपळ्याच्या सालांचा उपयोग करुन केलेली ही चटणी स्वादिष्ट होते, जी खाणाऱ्यांना बोटे चाटायला लावेल. ही चटणी केवळ स्वादिष्टच नाही, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीरसुद्धा आहे. चटणी बनवण्याची सोपी पद्धत शिकूया.

Stigma : महिलांसाठी क्षयरोग ठरतोय सायलंट किलर, पुरुष रुग्णांपेक्षा महिला रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकीत मोठी विषमता

साहित्य दोघांसाठी

advertisement

दुधी भोपळ्याचं साल: दुधी स्वच्छ धुऊन घ्या त्याचे लहान तुकडे करा.

हिरव्या मिरच्या: दोन-तीन

आलं: एक इंचाचा तुकडा

लसूण: चार-पाच पाकळ्या लसूण खात नसल्यास वगळा

जिरं: अर्धा चमचा

हिंग: चिमूटभर

मीठ: चवीनुसार

लिंबाचा रस: एक चमचा

बारीक चिरलेली कोथिंबीर

तेल: एक चमचा

Tuberculosis : जागतिक क्षयरोग दिन - क्षयरोग पूर्णपणे बरा होतो, जाणून घ्या लक्षणं, निदान, त्वरीत, नियमित औषधांचं महत्त्व

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात कोंबड्यांना मिळेल थंडावा, अमरावतीमधील शेतकऱ्याने शोधला देशी जुगाड, Video
सर्व पहा

कृती - प्रथम, एका कढईत तेल गरम करा. त्यात जिरं आणि हिंग घालून परतून घ्या. त्यात चिरलेली दुधी भोपळ्याची साल, हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घालून साल किंचित मऊ होईपर्यंत तीन-चार मिनिटं परतून घ्या. गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. आता, भाजलेलं मिश्रण मिक्सरच्या जारमध्ये ओता. मीठ, लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण बारीक वाटून घ्या. स्वादिष्ट आणि पौष्टिक चटणी तयार आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Food Food : दुधीच्या सालाची चटणी बनवण्याची सोपी कृती, चविष्ट आणि पौष्टिक पर्याय, नक्की करुन पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल