भाजी, सूप किंवा सॉसमधे टोमॅटो शिजवला जातो. पण टोमॅटोचं संपूर्ण पौष्टिक मूल्य कच्चं खाल्ल्यास सर्वोत्तम मिळतं. कच्चा टोमॅटो हलका, ताजा आणि आरोग्यासाठी खूप प्रभावी असतो. कच्च्या टोमॅटोत व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. टोमॅटो कच्चा खाल्ल्यानं व्हिटॅमिन सी टिकून राहतं, सर्दी आणि संसर्ग टाळण्यास याची मदत होते. पाहूयात टोमॅटोचे आणखी फायदे.
advertisement
Guava : हिवाळ्यात पेरु का खावा ? वाचा आरोग्यदायी फळाचे भरपूर फायदे
टोमॅटोमधले पोटॅशियम आणि लायकोपीन हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरतात. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही याची मदत होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
नैसर्गिकरित्या चमकणारी त्वचा हवी असेल तर आहारात कच्च्या टोमॅटोचा समावेश करा. त्यातील लायकोपिन, बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्वचा फ्रेश दिसते.
कच्च्या टोमॅटोमधे पाणी आणि फायबर दोन्ही भरपूर असतात. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्या दूर होतात आणि पचनसंस्था निरोगी राहते. टोमॅटो, ज्यात अंदाजे 95 टक्के पाणी असतं, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी याची मदत होते. उन्हाळ्यात कच्चे टोमॅटो खाल्ल्यानं थकवा, डोकेदुखी आणि डिहायड्रेशन टाळता येतं.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असतं, जे हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असतं. टोमॅटो नियमित खाल्ल्यानं ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होऊ शकतो. कच्च्या टोमॅटोमधे व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतं, डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात.
Preservatives : घरातल्या या पदार्थांना काढा बाहेर, प्रकृतीसाठी आहेत धोकादायक
स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर येणारा ताण आणि भविष्यातील डोळ्यांच्या समस्या टाळण्यास मदत करतात.
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी कच्चा टोमॅटो हे एक उत्तम नाश्ता आहे कारण त्यात कॅलरीज कमी असतात आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं. पोट भरलेलं ठेवण्यासाठी आणि वारंवार भूक लागण्यापासून टॉमेटोची मदत होते.
टोमॅटोमधील लायकोपीनमुळे काही कर्करोगांचा धोका कमी होतो असं म्हटलं जातं. टोमॅटोमधील फोलेट आणि मॅग्नेशियमचं प्रमाण मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे आणि मूड सुधारण्यास मदत करते.
