TRENDING:

Crash weight loss : वेगानं वजन कमी करणं म्हणजे प्रकृतीची हेळसांड, जाणून घ्या तज्ज्ञ असं म्हणण्याचं नेमकं कारण काय

Last Updated:

वजन कमी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण काहीजण, crash weight loss म्हणजेच लवकर वजन कमी करण्याचा विचार करतात. पण हा निर्णय तब्येतीच्या दृष्टीनं फायद्यापेक्षा जास्त नुकसान करणारा ठरू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वजन कमी असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. वजन जितकं वेगानं वाढतं तितकं वेगानं कमी होत नाही.
News18
News18
advertisement

वजन कमी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण काहीजण, crash weight loss म्हणजेच लवकर वजन कमी करण्याचा विचार करतात. पण हा निर्णय तब्येतीच्या दृष्टीनं फायद्यापेक्षा जास्त नुकसान करणारा ठरू शकतो.

क्रॅश वेट लॉस करण्याचे शरीरावर हानिकारक परिणाम होऊ शकतात. त्याचे दुष्परिणाम पाहूयात

पोषणाची कमतरता - जास्त काळ कमी कॅलरीज घेतल्यानं शरीराला आवश्यक पोषक घटकांपासून वंचित राहावं लागतं, ज्यामुळे प्रथिनं, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. अशावेळी,  अशक्तपणा, चक्कर येणं, केस गळणं, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, वारंवार संसर्ग होणं, सर्दी आणि आजार होणं अशी लक्षणं जाणवू शकतात.

advertisement

Dental Hygiene: दातांच्या स्वच्छतेचं 'दिलसे' कनेक्शन, वाचा दंत आरोग्याचं महत्त्व

Muscle loss - बराच काळ काहीही न खाल्ल्यानं चरबी तर कमी होईलच पण जलद वजन कमी झाल्यामुळे स्नायूंचं प्रमाण कमी होऊ शकतं. यामुळे शरीरावर परिणाम होतात. शक्ती कमी होणं आणि त्वचा सैल होणं, चयापचय मंदावणं अशा समस्या जाणवतात.

advertisement

पचनाच्या समस्या - चयापचय मंदावल्यानं भूक कमी होऊ शकते आणि पचनक्रिया लांबू शकते. बद्धकोष्ठता, आम्लता आणि गॅस यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

मानसिक परिणाम - चिडचिड होणं, ताणतणाव, थकवा येणं, एकाग्रतेचा अभाव

निरोगीपणे वजन कसं कमी करावं समजून घेऊयात -

संतुलित आहार घ्या.

पुरेशी प्रथिनं - डाळ, दूध, अंडी, सोया आहारात घ्या.

advertisement

फळं आणि भाज्या.

संपूर्ण धान्य खा.

निरोगी चरबी - हेल्दी फॅट्स

पुरेसं पाणी प्या.

नियमित व्यायाम करा

• चालणं / योग / Strength training / पोहणं

Tooth Ache : दातदुखीचे असतात विविध प्रकार, जाणून घ्या दात दुखण्याची अन्य कारणं

• क्रॅश डाएट टाळा

• खूप कमी कॅलरीज

• दिवसातून फक्त एक जेवण

advertisement

• फक्त रस किंवा द्रव आहार

• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करणं

• पुरेशी झोप घ्या

•झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलन आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक ते ट्रेंडी वस्तू, ठाण्यात स्वस्तात करा खरेदी, इथं भरलंय खास प्रदर्शन
सर्व पहा

मधुमेह, थायरॉईड, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब यापैकी कोणतीही समस्या असेल तर आहार व्यवस्थापनासाठी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Crash weight loss : वेगानं वजन कमी करणं म्हणजे प्रकृतीची हेळसांड, जाणून घ्या तज्ज्ञ असं म्हणण्याचं नेमकं कारण काय
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल