अनेकदा वातावरण, काहीवेळा कमी झोप, ताण, रक्तातील साखर, अन्न, अल्कोहोल आणि कधीही पूर्णपणे शांत न होणारी मज्जासंस्था, प्रतिकारशक्ती अशा विविध कारणांमुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, दिनचर्येत काही आरोग्यदायी पेयं असणं फायदेशीर आहे. जाणून घेऊया काही पर्याय.
Exfoliation : घरी तयार करा विंटर स्पेशल स्क्रब, जाणून घ्या विविध पर्याय आणि कृती
advertisement
आलं लिंबू पाणी - आलं आणि लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आलं आणि लिंबू या मिश्रणामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते यामुळे पचनसंस्था मजबूत राहते.
हळद आणि दूध - हळद आणि दूध, ज्याला गोल्डन मिल्क असंही म्हणतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो आणि त्वचेचा रंग सुधारतो. यामुळे चांगली झोप लागते, शरीराचं संसर्गापासून रक्षण होतं आणि सूज कमी होते.
बडीशेप पाणी - बडीशेप पाणी हा एक हर्बल पर्याय आहे. बडीशेप पाण्यात उकळून हे पेय बनवलं जातं. अडीचशे मिली कोमट पाण्यात आणि एक चमचा बडीशेपेची पूड घाला. या पाण्यामुळे पोट फुगण्याचं प्रमाण कमी होतं आणि पचन सुधारतं.
Women Health : स्त्रियांच्या अनेक समस्यांवर उपाय, आसनांमुळे शरीर राहिल लवचिक
दालचिनी पाणी - पचन सुधारण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दालचिनीचं पाणी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, आम्लता, कोलेस्ट्रॉल आणि सर्दी-खोकल्यापासूनही आराम मिळतो.
ग्रीन टी - ग्रीन टीमुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते. यामुळे ताण कमी होतो, चयापचय वाढतं, पचनसंस्था मजबूत होते आणि यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीर डिटॉक्सिफाय होतं आणि रोगांशी लढण्यासाठी शरीराला मदत होते.
