Exfoliation : हिवाळ्यासाठी घरी बनवा स्पेशल बॉडी स्क्रब, कोरड्या हवेतही चेहऱ्यावर दिसेल चमक

Last Updated:

एक्सफोलिएशनमुळे मृत त्वचा काढली जाते तसंच रक्ताभिसरणही सुधारतं. या प्रक्रियेसाठी महागड्या उत्पादनांची आवश्यकता नाही, घरीही नैसर्गिक बॉडी स्क्रब बनवू शकता. साखर आणि नारळ तेल स्क्रब, बेसन आणि दही स्क्रब, ओट्स आणि हनी स्क्रब, कॉफी आणि ऑलिव्ह ऑइल स्क्रब असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

News18
News18
मुंबई : हिवाळ्यामधे मुख्यत: त्वचेच्या समस्या जाणवतात. त्वचा कोरडी होणं, निस्तेज वाटणं आणि ताणल्यासारखी दिसते. थंड हवा आणि आर्द्रतेचा अभाव यामुळे मृत त्वचेच्या पेशी जमा होतात, ज्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते.
कोरड्या हवेत त्वचेची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. शरीराचं एक्सफोलिएशन अत्यंत महत्वाचं आहे. एक्सफोलिएशन म्हणजे त्वचेचा जो वरचा थर असतो, त्यातल्या मृत पेशी, घाण काढून टाकण्याची प्रक्रिया. यामुळे त्वचेवरची छिद्रं मोकळी होतात आणि मॉईश्चरायझेशनसाठीची उत्पादनं चांगली शोषली जातात.
एक्सफोलिएशनमुळे मृत त्वचा काढली जाते तसंच रक्ताभिसरणही सुधारतं. या प्रक्रियेसाठी महागड्या उत्पादनांची आवश्यकता नाही, घरीही नैसर्गिक बॉडी स्क्रब बनवू शकता. साखर आणि नारळ तेल स्क्रब, बेसन आणि दही स्क्रब, ओट्स आणि हनी स्क्रब, कॉफी आणि ऑलिव्ह ऑइल स्क्रब असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
advertisement
साखर आणि नारळ तेल स्क्रब - साखर हे एक उत्कृष्ट नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे, यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते. नारळ तेलानं त्वचा खोलवर मॉइश्चरायझ होते. हे स्क्रब बनवण्यासाठी,
दोन चमचे साखर आणि एक चमचा नारळ तेल मिसळा. आंघोळीपूर्वी शरीरावर हलक्या हातानं मसाज करा, नंतर कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा. हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी हा स्क्रब फायदेशीर आहे.
advertisement
कॉफी आणि ऑलिव्ह ऑइल स्क्रब - कॉफीमुळे त्वचा गुळगुळीत होते आणि घट्ट राहते. ऑलिव्ह ऑइलमुळे त्वचेला पोषण मिळतं आणि कोरडेपणा कमी होतो. दोन चमचे कॉफी पावडर आणि एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळून स्क्रब बनवा. हा स्क्रब विशेषतः कोपर, गुडघे आणि टाचांवर वापरा. ​​
ओट्स आणि हनी स्क्रब - संवेदनशील आणि कोरड्या त्वचेसाठी ओट्स उत्तम आहेत. यातल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे खाज सुटणं आणि जळजळ कमी होते. एक चमचा मध, दोन चमचे ओट्सच्या पीठात मिसळा आणि गरज लागली तर थोडं दूध घाला. या स्क्रबमुळे त्वचा मऊ होते तसंच नैसर्गिक चमकही कायम राहते.
advertisement
बेसन आणि दही स्क्रब - भारतीय घरांमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी शतकानुशतकं बेसनाचा वापर केला जात आहे. त्वचेची स्वच्छता आणि टॅन काढून टाकण्यासाठी याचा वापर होतो. दोन चमचे बेसन, एक चमचा दही आणि चिमूटभर हळद मिसळा. ही पेस्ट शरीरावर लावा, हलक्या हातानं घासून घ्या आणि सुकण्यापूर्वी स्वच्छ धुवा. हिवाळ्यात या स्क्रबमुळे त्वचा ताजी आणि निरोगी राहण्यास मदत होते.
advertisement
हिवाळ्यात आठवड्यातून केवळ एकदा किंवा दोनदाच बॉडी स्क्रब वापरा. ​​जास्त स्क्रबिंग केल्यानं त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्वचा जास्त काळ मऊ आणि हायड्रेट राहण्यासाठी स्क्रबिंगनंतर नेहमी मॉइश्चरायझर लावा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Exfoliation : हिवाळ्यासाठी घरी बनवा स्पेशल बॉडी स्क्रब, कोरड्या हवेतही चेहऱ्यावर दिसेल चमक
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement