या ऋतूत दम्याच्या रुग्णांसाठी अनेक समस्या निर्माण होतात. त्या घातकही ठरू शकतात. श्वास घ्यायला त्रास होणं, खोकला येणं, छातीत जडपणा जाणवणं, या सर्व समस्या या ऋतूत अचानक वाढतात. अशा परिस्थितीत दम्याच्या रुग्णांनी पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनकडून यासाठी संशोधन करण्यात आलं. जगभरातील अनेक भागात यासाठी अभ्यास करण्यात आला. सामान्य दिवसांच्या तुलनेत, पावसाळ्यात दम्याशी संबंधित समस्या 1.18 पट जास्त वाढतात. याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर आणि महिलांवर होतो. मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते आणि ते अनेकदा बाहेर खेळतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
advertisement
Belly Fat : लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे उपाय नक्की करुन पाहा, गंभीर आजार राहतील दूर
तर, महिलांना घरातील कामांमुळे जास्त धोका असतो - कपडे वाळवणं, झाडू मारणं, फरशी पुसणं, नियमित साफसफाई करणं यामुळे बुरशी आणि ओलावा येण्याची शक्यता जास्त असते.
संशोधनातल्या माहितीनुसार, लहान मुलांमधे हा धोका 1.19 पट जास्त आणि महिलांमध्ये 1.29 पट जास्त आहे. याशिवाय, जेव्हा जोरदार वादळ असतं आणि पाऊस पडतो तेव्हा दम्याचा त्रास 1.24 पटीनं वाढतो. अशा परिस्थितीत दम्याच्या रुग्णांना रुग्णालयात जावं लागतं. आपत्कालीन विभागात दाखल होण्याचा धोका 1.25 पटीनं वाढतो आणि त्यामुळे मृत्यूचा धोका 2.10 पटीनं वाढतो.
पावसाळ्यात निष्काळजीपणा दम्याच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतो. पावसाळ्यात बुरशी, धूळ, परागकण आणि विषाणूजन्य संसर्ग यासारख्या घटकांमुळे रुग्णांची स्थिती बिघडू शकते.
Gastric Headache : गॅसमुळे वाढते डोकेदुखी, कसं ठेवाल नियंत्रण ? या नैसर्गिक उपायांची होईल मदत
अशा परिस्थितीत, काही सोपे उपाय वापरून दम्याची लक्षणं बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करणं खूप महत्वाचं आहे. यासाठी पावसाळ्यात दम्याच्या रुग्णांनी काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. या ऋतूत घरात ओलसरपणा आणि बुरशी असणं सामान्य आहे, पण यामुळे दमा आणखी वाढू शकतो. म्हणून, घर नेहमी स्वच्छ आणि कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, हवेचा प्रवाह व्यवस्थित असावा जेणेकरून बुरशी वाढू नये. फर्निचर आणि भिंतींवर ओलावा निर्माण होऊ देऊ नका.
विशेषतः बाहेर जात असाल तेव्हा नेहमीच इनहेलर किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं सोबत ठेवा. फक्त आवश्यक कामासाठीच बाहेर पडा, या काळात मास्क घालायला विसरू नका. मास्कमुळे अनेक संसर्गांपासून रक्षण होतं. याशिवाय, पावसाळ्यात आहाराची विशेष काळजी घ्या. तळलेलं, थंड किंवा शिळं अन्न खाणं टाळा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करून घ्या जेणेकरून कोणताही धोका आधीच टाळता येईल.