Gastric Headache : गॅसमुळे वाढते डोकेदुखी, कसं ठेवाल नियंत्रण ? या नैसर्गिक उपायांची होईल मदत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मुंबई : पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत अनेक बदल झाले. अनेकदा योग्य वेळी न जेवणं, पुरेसं पाणी न पिणं या सगळ्याचे परिणाम तब्येतीवर जाणवतात. जेवणाच्या वेळा न सांभाळल्यानं अनेकदा तब्येतीच्या तक्रारी जाणवतात.
काही जण दुपारच्या जेवणाच्या वेळी नाश्ता करतात आणि संध्याकाळी दुपारचे जेवण करतात अशावेळी सर्वात मोठी समस्या उद्भवते. अनेकदा दोन जेवणांत जास्त वेळ घालवल्यामुळे पोटात गॅस तयार होतो. गॅस तयार झाल्यामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. अशावेळी, गॅस डोक्यापर्यंत गेला असं म्हटलं जातं. ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास वाढत जातो.
पोटाच्या त्रासानं होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आरोग्याशी खेळण्यासारखं आहे.
advertisement
गॅसमुळे होणारी डोकेदुखी म्हणजे काय?
पोटामुळे होणारी डोकेदुखी अपचन किंवा गॅस आणि आम्लता यासारख्या जठराशी संबंधित समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. मेंदू आणि आतडी एकमेकांशी जोडलेली असतात, त्यामुळे गॅस तयार होण्यामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते.
1. लिंबू पाणी - लिंबू पाण्यानं डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. गॅसमुळे डोकेदुखी होत असेल तर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यानं आराम मिळेल.
advertisement
2. ताक - गॅसमुळे वारंवार डोकेदुखी होत असेल, तर दिवसातून दोनदा ताक घेऊ शकता.
3. हायड्रेटेड राहा - कमी पाणी पिण्यामुळे देखील गॅसची समस्या उद्भवते. म्हणून दररोज पुरेसे पाणी पिणं महत्त्वाचं आहे आणि यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
4. तुळशीची पानं - तुळशीची सात-आठ पानं चावल्यानं डोकेदुखी कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो. तुळशीच्या पानांत वेदनाशामक गुणधर्म असतात, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 08, 2025 7:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Gastric Headache : गॅसमुळे वाढते डोकेदुखी, कसं ठेवाल नियंत्रण ? या नैसर्गिक उपायांची होईल मदत