कुठं फेडणार हे पाप! मध्यरात्री पुण्यातील मंदिरात घुसून नको ते केलं, भाविकांमध्ये तीव्र संताप
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता मात्र चोरीची एक अतिशय अजब घटना समोर आली आहे.
पुणे : पुण्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता मात्र चोरीची एक अतिशय अजब घटना समोर आली आहे. यात पुणे शहरातील पाषाण परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा आता देवाच्या चरणी वळवला असून, येथील दोन प्रसिद्ध मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या आहेत. चोरट्यांनी यातील सुमारे ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे पाषाण गाव परिसरात भाविकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
मंदिराचे दरवाजे उचकटून प्रवेश: पाषाण गावातील निम्हण आळी परिसरात श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि श्री गणेश मंदिर ही दोन पुरातन आणि जागृत देवस्थाने आहेत. गुरुवारी (२२ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधून मंदिराचे मुख्य दरवाजे उचकटले आणि आत प्रवेश केला.
advertisement
चोरट्यांनी मंदिरामधील दानपेटीचे कुलूप अत्यंत शिताफीने तोडले आणि त्यातील ४० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. शुक्रवारी सकाळी जेव्हा भाविक आणि पुजारी मंदिरात आले, तेव्हा त्यांना दरवाजा तुटलेला आणि दानपेटी रिकामी दिसली. या चोरीची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात मोठी गर्दी झाली होती.
याप्रकरणी विष्णू बबनराव निम्हण यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. पोलीस हवालदार दांगड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मंदिरांमध्ये सुरक्षा रक्षक किंवा अधिक सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आवाहन पोलिसांनी स्थानिक रहिवाशांना केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 8:45 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
कुठं फेडणार हे पाप! मध्यरात्री पुण्यातील मंदिरात घुसून नको ते केलं, भाविकांमध्ये तीव्र संताप









