Paschimottansana : वाढत्या वयात योगाभ्यासाचा आधार, पश्चिमोत्तानासानानं अनेक समस्या होतील कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
योगासनांमधे प्रत्येक समस्येवर उपाय आहे, मग ती शारीरिक असो वा मानसिक. वाढत्या वयाच्या समस्येशी संबंधित काही विकार असतील तर पश्चिमोत्तानासन विशेषतः फायदेशीर आहे. पश्चिमोत्तानासन या योगासनामुळे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही मदत होते.
मुंबई : भारतानं जगाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे योग. योगाभ्यासाचं महत्त्व जगभरात पोहचलं, या योगासनांमधे प्रत्येक समस्येवर उपाय आहे, मग ती शारीरिक असो वा मानसिक. वाढत्या वयाच्या समस्येशी संबंधित काही विकार असतील तर पश्चिमोत्तानासन विशेषतः फायदेशीर आहे. पश्चिमोत्तानासन या योगासनामुळे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही मदत होते.
पश्चिमोत्तानासन करण्याचे अनेक फायदे आहेत. पण हे करताना, तज्ज्ञ काही खबरदारी घेण्याचा सल्ला देखील देतात. पोटात अल्सर, हर्निया किंवा तीव्र पाठदुखी असेल तर त्यांनी हे आसन करू नये.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मते, हे आसन विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे. यामुळे लवचिकता वाढते तसंत अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यास देखील यामुळे मदत होते.
advertisement
पश्चिमोत्तानासन, ज्यात बसून पाय पुढे करणं आणि वाकणं या मुख्य क्रिया आहेत. या योगासनात, शरीर पुढे वाकवलं जातं आणि पाठीचा कणा, मांड्या आणि पोटऱ्यांचे स्नायू ताणले जातात. या आसनानं शरीराची लवचिकता वाढते आणि तणाव कमी करुन मानसिक शांती मिळण्यासाठी मदत होते.
advertisement
पश्चिमोत्तानासनाचे फायदे
पश्चिमोत्तानासनाचे अनेक फायदे आहेत. या आसनामुळे शरीरात लवचिकता येते. त्यामुळे पायांचे स्नायू, पोटऱ्या आणि पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत होतो, ज्यामुळे पाठदुखीपासूनही आराम मिळतो.
पोटाच्या स्नायूंवर हलका दाब पडल्यानं बद्धकोष्ठता, लठ्ठपणा आणि अपचन यासारख्या समस्या कमी होतात. या आसनामुळे सायटिकाची शक्यता कमी होते. ताण आणि चिंता कमी करून मन शांत राहतं. हे आसन विशेषतः वृद्धांसाठी फायदेशीर आहे.
advertisement
पश्चिमोत्तासन करण्याची योग्य पद्धत -
या आसनासाठी, प्रथम योगा मॅटवर बसा आणि दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. पायाची बोटं वरच्या दिशेनं ठेवा आणि पाठीचा कणा सरळ करा. दीर्घ श्वास घेत हात वर करा.
श्वास सोडताना, कंबरेपासून हळूहळू पुढे वाकून पायाची बोटं धरण्याचा प्रयत्न करा. यानंतर, तीस-पन्नास सेकंद या स्थितीत रहा, खोल श्वास घ्या.
advertisement
पश्चिमोत्तानासन करण्याचे अनेक फायदे असले तरी, तज्ज्ञ काही खबरदारी घेण्याचा सल्ला देखील देतात. पोटात अल्सर, हर्निया किंवा तीव्र पाठदुखी असेल तर हे आसन करू नये. तसंच, गर्भवती महिला आणि इतरांनी योगा करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सकाळी रिकाम्या पोटी हे करणं चांगलं असा सल्ला तज्ज्ञ देतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 08, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Paschimottansana : वाढत्या वयात योगाभ्यासाचा आधार, पश्चिमोत्तानासानानं अनेक समस्या होतील कमी


