Typhoid : पावसाळ्यात ओळखा आजारांचा धोका, वेळीच व्हा सावध

Last Updated:

टायफॉइड हा साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा जीवाणू सहसा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करतो. सुरुवातीला तो आतड्यांमध्ये सक्रिय राहतो आणि नंतर रक्तात मिसळतो आणि संपूर्ण शरीरात पसरतो. एकदा हा जीवाणू शरीरात गेला की, त्यामुळे ताप, डोकेदुखी, अशक्तपणा आणि भूक न लागणं यासारख्या विविध समस्या उद्भवायला सुरुवात होते.

News18
News18
मुंबई : पावसाळा असला की, अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. यापैकी एक म्हणजे टायफॉइड. टायफॉइडची लक्षणं सामान्य तापासारखी दिसतात. पण वेळीच उपचार केले नाहीत तर ते शरीराचं यामुळे गंभीर नुकसान होवू शकतं.
हा आजार साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि बहुतेकदा दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे पसरतो. टायफॉइडचं निदान झालं आणि उपचार सुरू केले तर व्यक्ती लवकर बरी होऊ शकते. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर आतडं, यकृत आणि मेंदूवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, टायफॉईडची लक्षणं ओळखणं आणि डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घेणं महत्वाचं आहे.
advertisement
टायफॉइड म्हणजे काय?
टायफॉइड हा साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा जीवाणू सहसा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करतो. सुरुवातीला तो आतड्यांत सक्रिय राहतो आणि नंतर रक्तात मिसळतो आणि संपूर्ण शरीरात पसरतो. एकदा हा जीवाणू शरीरात गेला की, त्यामुळे ताप, डोकेदुखी, अशक्तपणा आणि भूक न लागणं यासारख्या विविध समस्या उद्भवायला सुरुवात होते.
advertisement
टायफॉइड हा सामान्यतः स्वच्छतेचा अभाव, दूषित पाणी पिणं किंवा संक्रमित व्यक्तीशी संपर्क साधल्यानं पसरतो.
भारतासारख्या देशांत, जिथे अनेक भागात स्वच्छ पाणी आणि स्वच्छ अन्नाचा अभाव आहे, तिथे टायफॉइड पसरण्याचं प्रमाण अधिक आहे.
टायफॉइडची लक्षणं -
टायफॉइडची लक्षणं हळूहळू दिसून येतात. बहुतेकदा जीवाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते एकवीस दिवसांनी त्याची लक्षणं दिसू लागतात. त्याची मुख्य लक्षणं खालीलप्रमाणे आहेत:
advertisement
-थंडी वाजून येणारा ताप
-डोकेदुखी आणि शरीरदुखी
-पोटात सौम्य किंवा तीव्र वेदना
-भूक न लागणं
-सतत थकवा येणं
-अतिसार किंवा कधीकधी बद्धकोष्ठता
-शरीरात सौम्य कमजोरी
-काही प्रकरणांत, शरीरावर गुलाबी पुरळ देखील दिसतात.
टायफॉइडची कारणं -
टायफॉइड प्रामुख्यानं दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतो. हे जीवाणू कधीकधी अस्वच्छ हातांनी बनवलेल्या अन्नात आढळू शकतात. त्याची मुख्य कारणं म्हणजे -
advertisement
-संक्रमित व्यक्तीचं उरलेलं अन्न खाणं
-हात न धुता अन्न खाणं
-उघड्या किंवा अस्वच्छ पाण्यापासून बनवलेलं अन्न खाणं
-नाला किंवा घाणीजवळ राहणं
-बाधित भागात वारंवार प्रवास करणं
टायफॉइड स्पर्शानं पसरतो का ?
टायफॉइड स्पर्शानं पसरत नाही, पण एखाद्या संक्रमित व्यक्तीनं एखाद्या गोष्टीला स्पर्श केला आणि एखाद्या निरोगी व्यक्तीने ती वस्तू हातात धरली किंवा त्यातून काहीतरी खाल्लं तर संसर्ग पसरू शकतो. म्हणून, टायफॉइड टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Typhoid : पावसाळ्यात ओळखा आजारांचा धोका, वेळीच व्हा सावध
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement