VIDEO : WPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं, विचित्र पद्धतीने आऊट झाली खेळाडू, विकेटकिपरला काहीच करावं लागलं नाही, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
किरण नवगिरे आजच्या सामन्यात विचित्र पद्धतीने आऊट झाली होती. ही विकेट पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
WPL 2026 : वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये आज गुजरात जाएटसने युपी वॉरियरर्सचा 45 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह गुजरात जाएटस पॉईंटस टेबलमध्ये मोठी झेप घेत दुसरे स्थान गाठले आहे. या विजयासह एका गोष्टीची प्रचंड चर्चा रंगली आहे.ती म्हणजे किरण नवगिरेची. किरण नवगिरे आजच्या सामन्यात विचित्र पद्धतीने आऊट झाली होती. ही विकेट पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
गुजरात जाएटसने दिलेल्या 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युपीकडून मॅग लॅनिंग आणि किरण नगगिरे मैदानात उतरली होती. यावेळी गुजरातकडून रेणुका सिंह गोलंदाजीसाठी आली होती.यावेळी रेणूकाच्या तिसऱ्या बॉलवर तिन किरण नवगिरेला टाकलेला बॉल मिस झाला आणि थेट विकेटकिपरकडे गेला आणि ती स्टम्प आऊट झाली. पण हे स्टम्प आऊट विकेटकिपरने केलं नाही तर ती आपोआप आऊट झाली.
advertisement
Where did UP Warriorz find her?
For the last few games, she’s been playing strictly in binary. 0, 1, 0...#WPL26 pic.twitter.com/u6rbo7rvd1
— Neeraj (@NeerajY00859341) January 22, 2026
रेणूकाने टाकलेला बॉल किरण नवगिरेने मारता आला नाही आणि तो मागे निघून गेला. या दरम्यान किरण नवगिरे क्रिझ बाहेर आली होती. आणि विकेट किपरच्या पॅडला लागून बॉल थेट स्टम्पवर आदळला.ज्यावेळेस बॉल स्टम्पला आदळला तेव्हा किरण नवगिरे क्रिझबाहेर होती.त्यामुळे ती डोल्डन डकवर आऊट झाली. त्यामुळे अशा विचित्र पद्धतीने ती आऊट झाली.या संदर्भातला व्हिडीओ देखील समोर आला आहे.
advertisement
दरम्यान या सामन्यात गुजराने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना युपी वॉरियर्स 108 वर ऑलआऊट झाली होती. युपीकडून फोइब लिचफिल्डने सर्वाधिक 32 धावांची खेळी केली होती. तर इतर खेळाडू झटपट बाद झाले होते. गुजरातकडून राजेश्वरी गायकवाडने 3 तर रेणुका ठाकूर आणि सोफी डिवाईनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. केश्वी गौतम आणि अॅश्ले गार्डनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
advertisement
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 153 धावा केल्या होत्या. गुजरातकडून अॅशले गार्डनरने 50 धावांची सर्वाधिक खेळी केली.तिच्यासोबत बेथ मुनीने 38 धावा केल्या होत्या. तर गुजरातकडून क्रांती गौड आणि सोफीने प्रत्येकी 2 विकेट, दिप्ती शर्मा आणि क्लोने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 11:54 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : WPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं, विचित्र पद्धतीने आऊट झाली खेळाडू, विकेटकिपरला काहीच करावं लागलं नाही, नेमकं काय घडलं?








