Toll Plaza New Rule: सरकारचा मोठा झटका, टोल नाक्यावरील एक चूक महागात पडेल; गाडी विकणं, ट्रान्सफर सर्व काही बंद

Last Updated:
Motor Vehicles Rules 2026: टोल टॅक्सची थकबाकी असल्यास आता वाहन विक्री, ट्रान्सफर किंवा फिटनेस प्रमाणपत्र मिळणे थांबू शकते. केंद्र सरकारने सेंट्रल मोटर व्हेईकल रूल्स 2026 मध्ये बदल करत टोल कर भरल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
1/7
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सेंट्रल मोटर व्हेईकल रूल्स 2026 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. यापुढे टोल प्लाझाचा थकबाकी कर भरल्याशिवाय कोणतीही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याचा दुसरा अर्थ असा की टोल टॅक्स थकबाकी असल्यास आता वाहन विक्री करणे किंवा फिटनेस प्रमाणपत्र मिळवणे अशक्य होईल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सेंट्रल मोटर व्हेईकल रूल्स 2026 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. यापुढे टोल प्लाझाचा थकबाकी कर भरल्याशिवाय कोणतीही आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याचा दुसरा अर्थ असा की टोल टॅक्स थकबाकी असल्यास आता वाहन विक्री करणे किंवा फिटनेस प्रमाणपत्र मिळवणे अशक्य होईल.
advertisement
2/7
जर तुम्ही तुमची गाडी विकण्याचा विचार करत असाल किंवा फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्याचा विचार करत असाल, तर वेळीच सावध होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने रस्ते नियमांमध्ये मोठा बदल करत सांगितले आहे की, टोल प्लाझावरचा कर भरल्याशिवाय वाहन ट्रान्सफर, फिटनेस प्रमाणपत्र किंवा परवाना (Permit) मिळणार नाही. या संदर्भात सेंट्रल मोटर व्हेईकल रूल्स 2026 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
जर तुम्ही तुमची गाडी विकण्याचा विचार करत असाल किंवा फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्याचा विचार करत असाल, तर वेळीच सावध होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने रस्ते नियमांमध्ये मोठा बदल करत सांगितले आहे की, टोल प्लाझावरचा कर भरल्याशिवाय वाहन ट्रान्सफर, फिटनेस प्रमाणपत्र किंवा परवाना (Permit) मिळणार नाही. या संदर्भात सेंट्रल मोटर व्हेईकल रूल्स 2026 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
advertisement
3/7
बॅरियर-फ्री टोलिंगसाठी कठोर निर्णय:केंद्र सरकार देशभरात बॅरियर-फ्री टोलिंग प्रणाली लागू करण्याच्या दिशेने काम करत आहे. यालाच मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) प्रणाली म्हटले जाते. या प्रणालीत वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज नसते. FASTag, नंबर प्लेट ओळखणारे ANPR कॅमेरे आणि AI तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल आपोआप वसूल केला जातो. मात्र अनेक वेळा टोल नोंद झाल्यानंतरही पेमेंट होत नाही, त्यामुळे सरकारी महसुलाचे नुकसान होते. हीच समस्या टाळण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
बॅरियर-फ्री टोलिंगसाठी कठोर निर्णय: केंद्र सरकार देशभरात बॅरियर-फ्री टोलिंग प्रणाली लागू करण्याच्या दिशेने काम करत आहे. यालाच मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) प्रणाली म्हटले जाते. या प्रणालीत वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज नसते. FASTag, नंबर प्लेट ओळखणारे ANPR कॅमेरे आणि AI तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल आपोआप वसूल केला जातो. मात्र अनेक वेळा टोल नोंद झाल्यानंतरही पेमेंट होत नाही, त्यामुळे सरकारी महसुलाचे नुकसान होते. हीच समस्या टाळण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
advertisement
4/7
थकबाकी टोलवर सरकारचा कडक पवित्रा:‘अनपेड युजर फी’ ही नवीन संकल्पना नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाचा वापर केल्यानंतरही, राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 अंतर्गत ठरलेली फी जमा न झाल्यास ती थकबाकी म्हणून गणली जाईल. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या बदलांमुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) अत्याधुनिक आणि स्वयंचलित टोल वसुली प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवता येईल. यामुळे महामार्गांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी निधी उपलब्ध होईल.
थकबाकी टोलवर सरकारचा कडक पवित्रा: ‘अनपेड युजर फी’ ही नवीन संकल्पना नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाचा वापर केल्यानंतरही, राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 अंतर्गत ठरलेली फी जमा न झाल्यास ती थकबाकी म्हणून गणली जाईल. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या बदलांमुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) अत्याधुनिक आणि स्वयंचलित टोल वसुली प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवता येईल. यामुळे महामार्गांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी निधी उपलब्ध होईल.
advertisement
5/7
टोल थकबाकी असल्यास NOC नाहीरस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर राष्ट्रीय महामार्ग वापर शुल्क थकबाकी असेल, तर वाहनाचा मालकी हक्क ट्रान्सफर करणे किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन नेण्यासाठी आवश्यक असलेले नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) दिले जाणार नाही. कर युजर फी पूर्णपणे भरल्यानंतरच ही प्रक्रिया होऊ शकते.
टोल थकबाकी असल्यास NOC नाही रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर राष्ट्रीय महामार्ग वापर शुल्क थकबाकी असेल, तर वाहनाचा मालकी हक्क ट्रान्सफर करणे किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन नेण्यासाठी आवश्यक असलेले नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) दिले जाणार नाही. कर युजर फी पूर्णपणे भरल्यानंतरच ही प्रक्रिया होऊ शकते.
advertisement
6/7
फॉर्म 28 मध्येही बदल:वाहन ट्रान्सफरसाठी आवश्यक असलेल्या फॉर्म 28 मध्येही सरकारने बदल केले आहेत. आता वाहन मालकाला या फॉर्ममध्ये स्पष्टपणे नमूद करावे लागेल की, वाहनावर कोणत्याही टोल प्लाझाची थकबाकी आहे की नाही. थकबाकी असल्यास तिचा संपूर्ण तपशील देणे बंधनकारक असेल. दिलासादायक बाब म्हणजे, सरकार डिजिटल प्रक्रियेला प्रोत्साहन देत असून, फॉर्म 28 मधील महत्त्वाचे भाग ऑनलाइन पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
फॉर्म 28 मध्येही बदल: वाहन ट्रान्सफरसाठी आवश्यक असलेल्या फॉर्म 28 मध्येही सरकारने बदल केले आहेत. आता वाहन मालकाला या फॉर्ममध्ये स्पष्टपणे नमूद करावे लागेल की, वाहनावर कोणत्याही टोल प्लाझाची थकबाकी आहे की नाही. थकबाकी असल्यास तिचा संपूर्ण तपशील देणे बंधनकारक असेल. दिलासादायक बाब म्हणजे, सरकार डिजिटल प्रक्रियेला प्रोत्साहन देत असून, फॉर्म 28 मधील महत्त्वाचे भाग ऑनलाइन पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
advertisement
7/7
वाहनधारकांसाठी महत्त्वाचा इशारा:नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहन मालकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. FASTag मध्ये पुरेसा बॅलन्स ठेवणे, ई-नोटिसकडे दुर्लक्ष न करणे आणि वाहन विक्री, ट्रान्सफर किंवा फिटनेस रिन्यू करण्यापूर्वी कोणतीही टोल थकबाकी आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा आवश्यक कामे अडचणीत येऊ शकतात.
वाहनधारकांसाठी महत्त्वाचा इशारा: नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहन मालकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. FASTag मध्ये पुरेसा बॅलन्स ठेवणे, ई-नोटिसकडे दुर्लक्ष न करणे आणि वाहन विक्री, ट्रान्सफर किंवा फिटनेस रिन्यू करण्यापूर्वी कोणतीही टोल थकबाकी आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा आवश्यक कामे अडचणीत येऊ शकतात.
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement