बीटामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर असतात. बीटचा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यानं त्वचेतील कोलेजन वाढतं, त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळते, काळी वर्तुळं कमी होतात आणि त्वचेला चमक येते. मुरुमं कमी होतात आणि सुरकुत्याही कमी होतात.
बीट आणि दही
हा फेस पॅक बनवण्यासाठी चार चमचे बीटच्या रसात एक चमचा दही मिसळा. हे मिश्रण 15 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. चेहऱ्यावरील त्वचेच्या मृत पेशी निघू लागतात.
advertisement
Ayurvedic Oil : केस वाढवण्यासाठी करा आयुर्वेदिक तेलाचा वापर, केस होतील दाट आणि मुलायम
बीट आणि संत्र्याची साल
संत्र्याची सालं वाळवून आणि बारीक करून पावडर तयार करा. ही पावडर एका भांड्यात ठेवा आणि त्यात बीट चोळून किंवा गरजेनुसार बीटचा रस घालून पेस्ट तयार करा. हा फेस मास्क 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा. हा फेस मास्क आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावता येतो.
Cracked Heels : भेगाळलेल्या टाचांवर हा उपाय करुन बघा, भेगा भरुन येतील, पाय होतील मऊ
मुलतानी माती आणि बीट
हा फेस पॅक बनवण्यासाठी बीट बारीक करुन एका भांड्यात काढा. त्यात समान प्रमाणात मुलतानी माती टाकून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा, 20 ते 25 मिनिटं ठेवा आणि धुवा. हा फेसपॅक तेलकट त्वचेसाठी विशेष फायदेशीर ठरतो.
बीट आणि बेसन
फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा बेसन, एक चमचा चंदन पावडर, २ चमचे बीट रस, एक चमचा दही आणि थोडं गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट बनवा. स्वच्छ त्वचा मिळविण्यासाठी, ही पेस्ट 20 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा.