Cracked Heels : भेगाळलेल्या टाचांवर हा उपाय करुन बघा, भेगा भरुन येतील, पाय होतील मऊ

Last Updated:

घरगुती उपायांच्या मदतीनं भेगा पडलेल्या टाचा बऱ्या करायच्या असतील, तर काही घरगुती उपाय आहेत, जे काही दिवसातच भेगा पडलेल्या टाचांना पुन्हा मऊ आणि स्वच्छ बनवू शकतात.

News18
News18
मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात त्वचेशी संबंधित समस्या जास्त जाणवतात. त्यातलीच एक समस्या म्हणजे टाचेवरच्या भेगा. पण काही घरगुती उपायांनी, टाचांच्या भेगा एका आठवड्यात बऱ्या होतील आणि पाय मऊ होतील.
टाचेवर भेगा अनेकदा वेदनादायक देखील असू शकतात. हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते, पण योग्य काळजी आणि घरगुती उपायांनी ही समस्या सहज दूर होऊ शकते. महागडी क्रिम्स लावून टाचांच्या भेगा बरे करण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. पण तुम्हाला घरगुती उपचारांच्या मदतीनं भेगा कमी करायच्या असतील तर तुमच्यासाठी प्रभावी घरगुती उपाय आहेत.
1. खोबरेल तेल वापरा
advertisement
खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. झोपण्यापूर्वी पाय नीट धुवा आणि कोरडे करा. खोबरेल तेलानं टाचांना मसाज करा. स्वच्छ मोजे घालून झोपा. यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळतं आणि भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतात.
2. कोमट पाण्यात पाय भिजवा
advertisement
ही पद्धत तुमच्या टाचांमधील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. एका टबमध्ये कोमट पाणी घ्या, त्यात एक चमचा मीठ आणि दोन चमचे मध घाला. त्यात आपले पाय 15-20 मिनिटं भिजवा. प्युमिस स्टोननं हलक्या हातानं चोळा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.
3. मध
मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो आणि त्यामुळे त्वचा मुलायम होते. कोमट पाण्यात अर्धा कप मध मिसळा. त्यात पाय 15-20 मिनिटं भिजवा. नियमित वापरानं टाचा मऊ होतील.
advertisement
4. एलोवेरा जेलचा वापर
कोरफडीच्या वापरानं त्वचेवरच्या भेगा कमी करता येतात. झोपण्यापूर्वी पाय धुवून कोरडे करा. कोरफडीचा ताजा गर काढा आणि भेगा पडलेल्या टाचांवर लावा. सकाळी धुवा.
5. तूप आणि हळद यांचे मिश्रण
advertisement
तूप आणि हळद यांचं मिश्रण त्वचेला मॉइश्चरायझेशन आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते. एक
चमचा तुपात चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण तुमच्या भेगा पडलेल्या टाचांवर लावा आणि 30 मिनिटं राहू द्या. कोमट पाण्यानं धुवा.
6. ओटमील आणि दूध स्क्रब
ही कृती मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास आणि नवीन त्वचेच्या पोषणासाठी उपयुक्त आहे. 2 चमचे ओटमीलमध्ये थोडं दूध घालून पेस्ट बनवा. भेगा पडलेल्या टाचांवर लावा आणि हलक्या हातानं चोळा. 15 मिनिटांनी धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.
advertisement
काही महत्त्वाच्या टिप्स:
जास्त वेळ अनवाणी चालणं टाळा.
नेहमी हायड्रेटेड रहा आणि आपली त्वचा कोरडी होऊ देऊ नका.
मॉइश्चरायझरचा नियमित वापर करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cracked Heels : भेगाळलेल्या टाचांवर हा उपाय करुन बघा, भेगा भरुन येतील, पाय होतील मऊ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement