Treatment for White Hair : पांढऱ्या केसांचं घेऊ नका टेन्शन, आहारात बदल करा, केस राहतील काळे

Last Updated:

केस पांढरे होत असतील तर ते शरीरातील काही पोषक तत्वांची कमतरता याचं कारण असू शकतं. अशावेळी केसांची समस्या दूर करण्यासाठी आहारात काही बदल करणं गरजेचं असतं.

News18
News18
मुंबई : केस पांढरे होत असतील तर ते शरीरातील काही पोषक तत्वांची कमतरता याचं कारण असू शकतं.
अशावेळी केसांची समस्या दूर करण्यासाठी आहारात काही बदल करणं गरजेचं असतं. केस अकाली पांढरे होण्याची अनेक कारणं असू शकतात. अन्नातील पोषक तत्वांचा अभाव, केसांची योग्य काळजी न घेणं,
सूर्यप्रकाशाचे हानिकारक परिणाम आणि अनुवंशिकता ही देखील केस अकाली पांढरे होण्याची कारणं आहेत.
पण, जर लहान वयातच केस पांढरे होत असतील तर ते शरीरात आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील असू शकेल. अशावेळी, आहारात काही बदल केले तर शरीराला पुरेसं पोषण मिळतं. जेणेकरून केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होते.
advertisement
पालक
आहारात पालकाचा समावेश केला तर त्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावरही दिसून येतो.
पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. पालक खाल्ल्यानं ऑक्सिजन केसांमध्ये चांगल्या प्रकारे पोहोचतो. यामुळे केसांचा रंग काळा राहतो आणि केस अकाली पांढरे होण्याची समस्या येत नाही.
advertisement
आवळा
आवळा केसांसाठी अनेक प्रकारे वापरला जातो. आवळा डोक्यावर लावल्यानं केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
पांढऱ्या केसांना काळा रंग देण्यासाठी आवळ्यापासून हेअर कलरदेखील बनवले जातात आणि आवळा
खाल्ल्यानं केसांनाही फायदा होतो. आवळ्यात व्हिटॅमिन सी आहे आणि अकाली पांढरे होणारे केस काळे करण्यासाठी हा उपाय प्रभावी आहे.
अक्रोड
अक्रोडापासून केसांना बायोटिन मिळतं. बायोटिन केसांच्या ऊतींना मजबूत करतं आणि केसांचा नैसर्गिक रंग राखतं.
advertisement
तीळ
केस काळे करण्यासाठी आहारात तिळाचाही समावेश करु शकता. मेलॅनिनचं उत्पादन वाढवण्यासाठी तीळ प्रभावी आहेत. त्यामुळे केसांचा रंग काळा राहतो. तिळाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि जस्त असतं जे केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
advertisement
कढीपत्ता
अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी समृद्ध कढीपत्ता केसांसाठी फायदेशीर आहे. ही पानं खाल्ल्यानं केस पांढरे
होण्याची प्रक्रिया मंदावते. याशिवाय कढीपत्ता केसांना आतून मजबूत करतो आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी देखील प्रभावी आहे.
बदाम
बायोटिन भरपूर प्रमाणात असल्यानं केस काळे करण्यासाठी बदामही गुणकारी आहे. बदाम खाल्ल्यानं टाळूवरील केराटिनचं उत्पादनही वाढतं, ज्यामुळे केस मजबूत राहतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Treatment for White Hair : पांढऱ्या केसांचं घेऊ नका टेन्शन, आहारात बदल करा, केस राहतील काळे
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement