Tulsi Leaves : बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय, तुळशीची पानं खा, पोटाच्या त्रासाला दूर पळवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सकाळी तुळस, कडुनिंब आणि मध एकत्र करून खाल्ल्यानं अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीर अंतर्बाह्य स्वच्छ करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
मुंबई : खाण्यापिण्याच्या सवयीतल्या बदलांमुळे, पोटाशी संबंधित आजारांचं प्रमाण वाढलंय. बद्धकोष्ठता ही त्यातलीच एक समस्या. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरु शकतात.
तुळस, कडुनिंब आणि मध या तीन घटकांना आयुर्वेदात औषध मानलं जातं. सकाळी तुळस, कडुनिंब आणि मध एकत्र करून खाल्ल्यानं अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीर अंतर्बाह्य स्वच्छ करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
advertisement
कडुनिंब आणि तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आढळतात आणि मधामध्ये
अँटीबेक्टेरियल गुणधर्म आढळतात ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. या तिन्ही पदार्थांच्या सेवनानं
सर्दी, संसर्ग आणि फ्लूपासून बचाव होऊ शकतो.
तुळशीमध्ये आढळणारे घटक बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुळशीच्या पानांचं नियमित सेवन केल्यानं अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. ही पानं खाल्ल्यानं गॅस आणि पोट फुगणं यासारख्या समस्या टाळता येतात. याचं सेवन दररोज केल्यानं सकाळी पोट सहज साफ होण्यास मदत होते.
advertisement
कडुनिंब शरीरातील घाण साफ करण्यास मदत करू शकते, तुळस यकृत मजबूत करण्यास मदत करू शकते आणि मधामुळे शरीरातील आर्द्रता राखण्यात मदत होते. या तिन्हीच्या एकत्र सेवनानं शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
तुळशीची 4-5 ताजी पानं सकाळी रिकाम्या पोटी चावू शकता.
advertisement
तुळशीची 5-6 पानं पाण्यात उकळून त्यात थोडं आलं आणि मध घालून चहा बनवू शकता.
तुळशीची 8-10 पानं एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी प्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2024 6:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Tulsi Leaves : बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय, तुळशीची पानं खा, पोटाच्या त्रासाला दूर पळवा