Ayurvedic Oil : केस वाढवण्यासाठी करा आयुर्वेदिक तेलाचा वापर, केस होतील दाट आणि मुलायम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आयुर्वेदात केस गळणं थांबवण्यासाठी आणि निरोगी बनवण्यासाठी तसंच केस लांब आणि दाट करण्यासाठी अनेक प्रकारच्या तेलांचा उल्लेख केला आहे. या तेलांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते कोणत्याही प्रकारच्या घातक रसायनांचा वापर या तेलात केलेला नसतो.
मुंबई : केस लांब आणि दाट असावेत यासाठी अनेक प्रकारचे तेल आणि घरगुती उपाय केले जातात. आयुर्वेदात केस गळणं थांबवण्यासाठी आणि निरोगी बनवण्यासाठी तसंच केस लांब आणि दाट करण्यासाठी अनेक प्रकारच्या तेलांचा उल्लेख केला आहे. या तेलांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते कोणत्याही प्रकारच्या घातक रसायनांचा वापर या तेलात केलेला नसतो.
या तेलामुळे केसांची वाढ जलद करण्यास मदत होते. त्यातल्याच काही तेलांची माहिती
भृंगराज तेल
औषधी वनस्पतींचा राजा म्हणून ओळखलं जाणारं भृंगराज तेल टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करतं. यामुळे केस गळणं, कोंडा होणं आणि कोरडे केस यासारख्या केसांशी संबंधित अनेक समस्या कमी होऊ लागतात, उत्तम परिणामांसाठी भृंगराज तेल तिळाच्या तेलात मिसळून लावावं. दोन्ही तेलांचं मिश्रण करून आणि आठवड्यातून एकदा टाळूचा मसाज केला तर फायदे लवकर दिसून येतील.
advertisement
आवळा तेल
आवळा तेलात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटनं असतात, त्यामुळे केसांच्या मुळं मजबूत होतात. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. केस गळणं कमी झाल्यामुळे केस दाट होतात. आवळा तेल नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावल्यानं उपयोग जास्त होतो.
advertisement
ब्राह्मी तेल
ब्राह्मी तेल टाळूच्या समस्या दूर करतं आणि टाळू शांत करतं. यामुळे तणाव कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. या प्रभावामुळे केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या कमी होते. नारळ आणि ऑलिव्ह ऑईल मंद आचेवर गरम करा. ब्राह्मी तेल अधिक फायदेशीर बनवण्यासाठी भृंगराज पावडर, आवळा पावडर आणि शिकेकाई पावडर एकत्र करून लावा.
advertisement
मेंदी तेल
केसांसाठी नैसर्गिक रंग म्हणून काम करण्याबरोबरच, मेंदी केसांचं आरोग्य सुधारुन जलद वाढ करण्यास देखील मदत करते. मेंदीचं तेल लावल्यानं टाळूवर नैसर्गिक तेलाचं उत्पादन वाढतं, ज्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं.
मेथी तेल
मेथीचा उपयोग केस जलद वाढवण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी होतो. मेथीचं तेल लावल्यानं टाळूचं आरोग्य सुधारतं आणि केसांशी संबंधित समस्या कमी होतात.
advertisement
तिळाचं तेल
तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतं. यासोबतच तिळात ओमेगा फॅटी ॲसिड असतं. यामुळे टाळूचं पोषण करुन कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. केसांच्या वाढीचा वेग यामुळे वाढतो.
जास्वंदीचं तेल
जास्वंदीच्या तेलामध्ये अमीनो ॲसिड आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वं असतात आणि त्यामुळे केस मजबूत होतात. केस टोकाला तुटण्याची समस्या कमी होते. या तेलामुळे केस कोरडे होण्याचं प्रमाण कमी होतं आणि केसांच्या वाढीचा वेग वाढतो.
advertisement
तेल लावण्यापूर्वी ते कोमट करून बोटांच्या सहाय्यानं केसांच्या मुळांवर लावावं. हे तेल केसांवर काही वेळ राहू द्यावं आणि नंतर केमिकल फ्री शॅम्पूनं केस स्वच्छ करावेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2024 12:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ayurvedic Oil : केस वाढवण्यासाठी करा आयुर्वेदिक तेलाचा वापर, केस होतील दाट आणि मुलायम