आयुर्वेदिक डॉक्टर यांनी याबाबत सांगितले की, या काळात तुम्ही खानपानात बदल करायला हवा. थंडीच्या काळात गरम वस्तू खायला हव्यात. यामुळे शरीर आरोग्यदायी राहते आणि चयापचय क्रिया देखील ठीक राहते.
advertisement
हिवाळ्यात दररोज 3 ते 4 खजूर खाल्ल्याने खूप फायदा होतो. यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही. महिलांना ॲनिमियाचा त्रास होत असल्याचे अनेकदा दिसून येते. मात्र, ही कमतरता खजुराच्या सेवनाने भरून काढता येते.
खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. खजूरमध्ये बोरॉन आढळते. यामुळे हाडे मजबूत होतात. थंडीत खजुराच्या सेवनाने सांधेदुखीचा त्रास होत नाही.
खजूरमध्ये लोह असते. यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढते, केस जाड आणि मजबूत होतात. म्हणून जर तुमचे केस गळत असतील किंवा कमकुवत झाले असतील तर खजुराचे सेवन फायदेशीर ठरते.
जर तुम्ही तुमच्या मुलाची बुद्धी आणखी कुशाग्र करायची असेल तर त्यांना सकाळी खजूर द्या. खजूरमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. यामुळे ते मेंदूला अधिक चांगले कार्य करण्यास सक्षम करतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
सूचना - या बातमीत दिलेली माहिती, आरोग्यविषयक सल्ले हे तज्ञांशी झालेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच फॉलो करावी. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.