TRENDING:

Soaked Dry Fruits : सुका मेवा भिजवून खाण्याचे फायदे, शरीरासाठी पौष्टिकतेचा खजिना

Last Updated:

दूध आणि सुका मेवा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सुका मेवा नुसता खाल्ल्यानं त्रास होतो. काही ड्रायफ्रूट्स जास्त प्रमाणात खाल्ल्यानं पित्त दोष होतो म्हणून सुका मेवा पाण्यात किंवा दुधात भिजवून खाणं उपयुक्त आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  सुक्या मेव्यामध्ये पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात असतात. पण काहीवेळा सुका मेवा नुसता खाल्ल्यानं त्रास होतो. काही ड्रायफ्रूट्स जास्त प्रमाणात खाल्ल्यानं पित्त दोष वाढू शकतो. सुका मेवा भिजवून खाल्ल्यानं त्यातली उष्णता कमी होते आणि ते थंड होतात. सुका मेवा भिजवून खाल्ल्यानं पचनाचे विकार आणि पित्त दोषानं ग्रस्त असलेल्यांसाठी अधिक सहज पचण्याजोगं बनतं. त्यातूनही दुधात भिजवलेल्या मनुका खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात. कारण बेदाण्यांमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असे अनेक गुणधर्म आढळतात.
News18
News18
advertisement

दूध आणि सुका मेवा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण जाणून आहोत. दुधामध्ये प्रथिनं, कॅल्शियम आणि रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी-2 असे अनेक गुणधर्म आढळतात आणि ते सुक्या मेव्यासह एकत्र खाल्ले तर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. काही जण पाण्यात तर काही जण दुधात भिजवून सुका मेवा खातात. आज पाहूया, त्यातल्या मनुका भिजवून खाण्याचे फायदे...

advertisement

Raw Milk Benefits : चेहऱ्यासाठी करा कच्च्या दुधाचा वापर, निस्तेज त्वचेसाठी प्रभावी नैसर्गिक उपाय

1. वजन वाढवण्यासाठी -

तुमची तब्येत अशक्त वाटत असेल आणि तुम्हाला शरीराला बळकटी द्यायची असेल तर हा एक चांगला उपाय आहे. दुधात भिजवलेल्या मनुका खाल्ल्यानंतर उरलेलं दूधही प्या. यासाठी रात्री झोपताना, दुधात मनुका घालून रात्रभर ठेवा आणि सकाळी खा. 

advertisement

2. पचनासाठी-

सकाळी रिकाम्या पोटी दुधात भिजवलेल्या मनुका खाल्ल्यानं पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. थंडीच्या काळात बद्धकोष्ठतेची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते, अशावेळी हा उपाय निश्चितच फायदेशीर आहे.

Dandruff : कोंड्यापासून करा सुटका, हे उपाय करुन बघा, कोंड्याचं प्रमाण होईल कमी

3. हाडांसाठी-

दररोज सकाळी दुधात भिजवलेल्या मनुका खाल्ल्यानं हाडं मजबूत होण्यास मदत होते. मनुका आणि दूध हे दोन्ही कॅल्शियमचे चांगले स्रोत मानले जातात. कॅल्शियम हाडांसाठी खूप महत्वाचं आहे. हिवाळ्यात हाडे खूप कमकुवत होतात. त्यामुळे हा उपाय नक्की करुन पाहा.

advertisement

4. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी-

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, तुम्ही दुधात भिजवलेले मनुके खाऊ शकता. कारण यामध्ये असलेले गुणधर्म कमकुवत प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Soaked Dry Fruits : सुका मेवा भिजवून खाण्याचे फायदे, शरीरासाठी पौष्टिकतेचा खजिना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल