Dandruff : कोंड्यापासून करा सुटका, हे उपाय करुन बघा, कोंड्याचं प्रमाण होईल कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केसांवर कोंडा जास्त वाढल्यानं केस पांढरे दिसू लागतात. अनेकदा कोंड्यामुळे टाळूलाही खाज सुटते. यासाठी काही घरगुती उपाय करुन बघता येतील.
मुंबई : हिवाळ्यात कोंड्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. केस अस्वच्छ असणं, केसांची योग्य काळजी न घेणं, केसांसाठी चुकीची उत्पादनं वापरणं आणि गरम पाण्यानं केस धुणं यामुळेही कोंडा होऊ शकतो. केसांवर कोंडा जास्त वाढल्यानं केस पांढरे दिसू लागतात.
अनेकदा कोंड्यामुळे टाळूलाही खाज सुटते. यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
1. दही -
दह्यामध्ये प्रथिनं चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमाण कमी होतं. पेस्टप्रमाणे केसांवर दही लावल्यानं ही समस्या दूर होऊ शकते.
2. लिंबू-
खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्यानं कोंड्याची समस्या कमी होते.
advertisement
3. कोरफड -
कोरफड मधील अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते. तेल आणि लिंबू मिक्स करुन तुम्ही कोरफडही लावू शकता.
4. बेकिंग सोडा-
बेकिंग सोडा केसांना लावल्यानं कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळते.
5. मेथी-
मेथीच्या दाण्यांची पेस्ट केसांवर लावल्यामुळेही कोंड्याचं प्रमाण कमी होतं. मेथीचे दाणे तेलात उकळून थंड करुनही लावू शकता.
advertisement
6. कडुनिंब-
कडुनिंबाची पानं पाण्यात उकळून या पाण्यानं केस धुतल्यानंही कोंड्याचं प्रमाण कमी होतं.
हे उपाय नक्की करुन बघा, यानंतरही कोंडा कमी झाला नाही तर केशतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2024 6:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dandruff : कोंड्यापासून करा सुटका, हे उपाय करुन बघा, कोंड्याचं प्रमाण होईल कमी


