Raw Milk Benefits : चेहऱ्यासाठी करा कच्च्या दुधाचा वापर, निस्तेज त्वचेसाठी प्रभावी नैसर्गिक उपाय

Last Updated:

कच्च्या दुधाचा वापर त्वचेसाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. मध किंवा लिंबू एकत्र वापरलं तर तुमची त्वचा आतून उजळते आणि त्यामुळे चमकदार दिसते.

News18
News18
मुंबई : हिवाळ्यात त्वचेच्या तक्रारी जास्त जाणवतात. हिवाळ्यातही त्वचेवरची चमक कायम ठेवण्यासाठी काही उपाय करुन बघा. चेहऱ्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करता येईल. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल. कारण कच्च्या दुधाचा वापर त्वचेसाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. मध किंवा लिंबू एकत्र वापरलं तर तुमची त्वचा आतून उजळते आणि त्यामुळे चमकदार दिसते.
खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं, योग्य काळजी न घेतल्यानं आपली त्वचा थकलेली दिसते. प्रदूषण, ताणतणाव आणि खराब जीवनशैलीमुळे त्वचेवर डाग, चट्टे आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हं दिसू लागतात. यात रासायनिक उत्पादनांचा वापर न करता, त्वचा नैसर्गिक पद्धतीनं सुधारायची असेल, तर कच्चं दूध तुमच्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो. कच्च्या दुधाचा वापर त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचेचं पोषण करण्याचं काम करतात.
advertisement
1. कच्चं दूध आणि मध
कच्चं दूध आणि मध यांचं मिश्रण तुमच्या त्वचेसाठी खूपच उपयुक्त ठरु शकतं. मधामध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होते. तसंच त्वचेवरील डाग कमी करुन ती उजळण्यास मदत होते. कच्च्या दुधात लॅक्टिक ॲसिड असतं, जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकतं आणि नवीन पेशी निर्माण करण्यास मदत करतं.
advertisement
वापरण्याची पद्धत:
एक चमचा कच्च्या दुधात एक चमचा मध मिसळा. चांगलं मिसळून चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटं राहू द्या, नंतर कोमट पाण्यानं धुवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे करा, काही दिवसातच तुम्हाला फरक दिसेल.
2. कच्चं दूध आणि लिंबाचा रस
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट असतात, जे त्वचेला आतून स्वच्छ करतात आणि ती चमकदार बनवतात.  कच्च्या दुधात लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे ते त्वचा मऊ आणि कोमल बनवतं.
advertisement
वापरण्याची पद्धत:
एक चमचा कच्च्या दुधात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. चांगलं मिसळून नंतर चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटं राहू द्या आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा करा, त्वचेवर फरक दिसून येईल.
हे मिश्रण प्रभावी का आहे?
कच्चे दूध: कच्च्या दुधात लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेतील घाण आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. ते त्वचा मऊ आणि गुळगुळीत करते आणि तिची नैसर्गिक चमक कायम ठेवते.
advertisement
मध : मधामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात ज्यामुळे त्वचेला पुरेशी आर्द्रता आणि पोषण मिळतं. तसंच त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते.
लिंबाचा रस: लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेचा टोन हलका करते आणि ते चमकते.
या बाबी लक्षात ठेवा :
तुमची त्वचा संवेदनशील असेल तर प्रथम पॅच टेस्ट करून हे मिश्रण वापरायचं की नाही ते तपासून घ्या.
advertisement
लिंबाचा रस लावल्यानंतर थेट सूर्यकिरण चेहऱ्यावर येण्याचं टाळा कारण लिंबू त्वचेला सूर्यकिरणांना अधिक संवेदनशील बनवते. तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची सूज येत असेल तर हे उपाय करु नका.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Raw Milk Benefits : चेहऱ्यासाठी करा कच्च्या दुधाचा वापर, निस्तेज त्वचेसाठी प्रभावी नैसर्गिक उपाय
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement