advertisement

Shocking : नशीब बलवत्तर म्हणून मोठा घात टळला; नाशिक-मुंबई हायवेवर ते दृश्य पाहून तुम्हीही हादरुन जाल

Last Updated:

Thane News : माजिवाडा जंक्शन परिसरात नाशिक–मुंबई मार्गावर एक मोठा अपघात होता होता टळला आहे. शिवाय प्रशासनाच्या जलद कारवाईमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.

Height barrier breaks near Majiwada Junction Thane
Height barrier breaks near Majiwada Junction Thane
ठाणे : माजिवाडा जंक्शन परिसरातील नाशिक-मुंबई मार्गावर संभाव्य मोठी दुर्घटना टळली. नेमके काय घडले आणि ही बाब कशामुळे उघडकीस आली याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
सकाळची ती वेळ अन् समोर साक्षात मृत्यू
माजिवाडा जंक्शन परिसरात नाशिक-मुंबई मार्गावरील हाइट बॅरियर गुरुवारी सकाळी सुमारे पावणेसातच्या सुमारास तुटून रस्त्यावर लटकत असल्याची घटना उघडकीस आली. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता.
सुदैवाने जीवितहानी टळली
स्थानिक नागरिक मंगेश बसवंत यांनी पुलाजवळील हाइट बॅरियर तुटून धोकादायक अवस्थेत असल्याचे पाहिले. पुढे होणारा अपघात टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवले. माहिती मिळताच पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत तुटलेला आणि खाली लटकत असलेला बॅरियर सुरक्षितरीत्या हटवला. या कामादरम्यान काही वेळ वाहतूक मंदावली होती. मात्र प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली.
दरम्यान हाइट बॅरियर नेमका कशामुळे तुटला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking : नशीब बलवत्तर म्हणून मोठा घात टळला; नाशिक-मुंबई हायवेवर ते दृश्य पाहून तुम्हीही हादरुन जाल
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement