IND vs PAK मॅचच्या पाकिस्तानला मोठा धक्का! 72 तासाआधीच टीम इंडियाने दाखवली 'जागा'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
T20 World Cup 2026 Group A Points Table : पाकिस्तानच्या खात्यातही 4 पॉइंट्स जमा आहेत, मात्र भारताचा नेट रन रेट +3.050 इतका जबरदस्त असल्याने त्यांनी पाकिस्तानला (+0.932) मागे टाकले आहे.
India vs Pakistan, T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 चा स्पर्धा आता रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि नामीबिया यांच्यात 18 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात विजय मिळवत भारतीय टीमने आपली विजयाची घोडदौड कायम ठेवत ग्रुप A च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताने गुरुवारी झालेल्या महत्त्वाच्या मॅचमध्ये नामिबियाचा 93 रन्सने पराभव केला, ज्यामुळे त्यांच्या नेट रन रेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. नव्या अधिकृत अपडेटनुसार, टीम इंडियाने सलग दोन मॅचेस जिंकून 4 पॉइंट्ससह पहिले स्थान गाठलं आहे.
पाकिस्तानला मोठा धक्का
ग्रुप A मध्ये भारतासोबतच पाकिस्ताननेही दोन मॅचेस खेळल्या असून दोन्हीमध्ये विजय मिळवला आहे. मात्र, पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने पाईंट्स टेबलमधील अव्वल स्थान गमावलं आहे. टीम इंडियाने त्यावर कब्जा केलाय. पाकिस्तानच्या खात्यातही 4 पॉइंट्स जमा आहेत, मात्र भारताचा नेट रन रेट +3.050 इतका जबरदस्त असल्याने त्यांनी पाकिस्तानला (+0.932) मागे टाकले आहे. या ग्रुपमध्ये नेदरलँड्स 2 पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांनी दोनपैकी एक मॅच जिंकली आहे.
advertisement
पाईंट्स टेबलची काय परिस्थिती?
दुसरीकडे, अमेरिका (USA) आणि नामिबिया या दोन्ही टीम्सना अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. दोन्ही टीम्सनी प्रत्येकी दोन मॅचेस खेळल्या असून दोन्हीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेचा नेट रन रेट -1.525 आहे, तर नामिबिया -2.884 च्या नेट रन रेटसह गुणतालिकेत सर्वात शेवटच्या म्हणजेच पाचव्या क्रमांकावर आहे.
advertisement

T20 World Cup 2026 Group A Points Table update
भारत विरुद्ध पाकिस्तान
दरम्यान, आता संपूर्ण जगाचे लक्ष 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय-व्होल्टेज मॅचकडे लागलं आहे. या मॅचमध्ये विजय मिळवणारी टीम सुपर 8 साठी आपले स्थान जवळजवळ निश्चित करेल. भारताचा सध्याचा फॉर्म पाहता, चाहते या महामुकाबल्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 10:29 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK मॅचच्या पाकिस्तानला मोठा धक्का! 72 तासाआधीच टीम इंडियाने दाखवली 'जागा'










