advertisement

सानिकाचा तो गोड आवाजातला एक फोन अन् पुण्यातील लाँड्री व्यावसायिकाचा 'गेम', पुढं घडलं असं ज्याचा विचारही केला नसेल

Last Updated:

पर्वतीमधील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या तक्रारदाराला ऑगस्ट महिन्यात सानिका गोखले नावाच्या एका महिलेने फोन केला. तिने गोड बोलून तक्रारदार आणि त्यांच्या भावाला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतले

महिलेकडून व्यावसायिकाची फसवणूक (AI Image)
महिलेकडून व्यावसायिकाची फसवणूक (AI Image)
पुणे: एका अज्ञात महिलेचा गोड आवाजातील फोन एका लाँड्री व्यावसायिकाला चक्क सव्वा कोटी रुपयांना पडला आहे. पुण्याच्या पर्वती परिसरातील एका ४८ वर्षीय व्यावसायिकाची सायबर भामट्यांनी १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असं रचलं सानिकाने जाळं
पर्वतीमधील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या तक्रारदाराला ऑगस्ट महिन्यात सानिका गोखले नावाच्या एका महिलेने फोन केला. तिने गोड बोलून तक्रारदार आणि त्यांच्या भावाला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास घरबसल्या प्रचंड नफा मिळेल, असे आमिष तिने दाखवले. सुरुवातीला गुंतवणुकीच्या विविध योजना सांगून सानिकाने त्यांचा विश्वास संपादन केला.
advertisement
आभासी नफा अन् प्रत्यक्षात लूट
सानिकाच्या शब्दावर विश्वास ठेवून या व्यावसायिकाने विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने १ कोटी १५ लाख ११ हजार रुपये जमा केले. आरोपींनी एका बनावट पोर्टलवर त्यांना मोठा परतावा मिळाल्याचे आभासी चित्र दाखवले. आपला पैसा वाढत आहे, या भ्रमात व्यावसायिक अधिक पैसे गुंतवत राहिला. मात्र, जेव्हा त्यांनी हा नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तांत्रिक अडचणींचे कारण देऊन आरोपींनी संपर्क तोडला.
advertisement
सायबर पोलिसांत धाव
कोणताही परतावा न मिळाल्याने आणि आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आता सानिका गोखले, व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. शेअर बाजाराच्या नावाखाली पुण्यात सुरू असलेल्या या मोठ्या 'रॅकेट'चा पोलीस आता कसून तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
सानिकाचा तो गोड आवाजातला एक फोन अन् पुण्यातील लाँड्री व्यावसायिकाचा 'गेम', पुढं घडलं असं ज्याचा विचारही केला नसेल
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement