Pigmentation - चेहऱ्यावरच्या डागांसाठी रामबाण उपाय, घरातच आहे उत्तर

Last Updated:

अनेकदा खूप औषधं वापरुनही चेहऱ्यावरचे डाग कमी होत नाहीत. पण घरातल्या काही गोष्टींचा वापर केला तर डागांचा गडदपणा हळूहळू कमी होऊ शकतो.

News18
News18
मुंबई : अनेकदा खूप औषधं वापरुनही चेहऱ्यावरचे डाग कमी होत नाहीत. पण घरातल्या काही गोष्टींचा वापर केला तर डागांचा गडदपणा हळूहळू कमी होऊ शकतो.
चेहऱ्यावर ठिपके येण्याची अनेक कारणं असू शकतात. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यानं, सूर्यप्रकाशाचा परिणाम, त्वचेवर रासायनिक पदार्थांचा वापर आणि संप्रेरकांचं असंतुलन यामुळेही चेहऱ्यावर डाग येऊ शकतात. रासायनिक द्रव्य नसल्यानं आणि नियमितपणे वापरल्यानं त्वचा उजळण्यासाठी याचा उपयोग होतो.
दूध आणि मध
दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, ज्यामुळे डाग कमी होतात, तर मधामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेला आवश्यक आर्द्रता पुरवतात. दूध आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यानं डाग कमी होतात. यासाठी, दूध आणि मध समान प्रमाणात मिसळा आणि कापसाच्या मदतीनं चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण स्पॉट ट्रीटमेंट म्हणून जिथे, डाग आहेत तिथे लावा. पंधरा - वीस मिनिटांनी धुवा.
advertisement
बटाट्याचा रस
ब्लीचिंग गुणधर्म असलेल्या बटाट्याचा रस डागांवर लावल्यानं डाग कमी होण्यास मदत होते. बटाटा किसून त्याचा रस एका भांड्यात काढा. या रसात कापूस बुडवून डागांवर लावा आणि 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.
advertisement
पपई
पपईमध्ये आढळणारे घटक डाग हलके करण्यासाठी प्रभावी आहेत. पपई त्वचेवर नुसतीही लावता येते किंवा तुम्ही त्यात मध मिसळून फेस पॅक म्हणून चेहऱ्यावर लावू शकता. 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा धुवा.
हळद आणि दूध
हळद आणि दूध चेहऱ्यावर लावल्यानंही चट्टे कमी होतात. एका भांड्यात दोन चमचे दूध घेऊन त्यात चिमूटभर हळद घालून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेला चमक येते आणि डाग कमी होऊ लागतात. हा उपाय आठवड्यातून 2-3 वेळा वापरला जाऊ शकतो.
advertisement
मसूर
मसूरमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात जे हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यासाठी प्रभावी असतात. मसूर रात्रभर भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बारीक करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Pigmentation - चेहऱ्यावरच्या डागांसाठी रामबाण उपाय, घरातच आहे उत्तर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement