TRENDING:

महिलांनो, ‘या’ लक्षणांकडं करु नका दुर्लक्ष, ब्रेस्ट कॅन्सरचा असू शकतो धोका!

Last Updated:

ब्रेस्ट कॅन्सर होण्याची लक्षणं काय आहेत? त्यापासून काय काळजी घ्यावी? पाहूया

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 4 सप्टेंबर : ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण महिलांमध्ये मोट्या प्रमाणात वाढलंय. महिलांमधील मृत्यूचं हे दुसरं कारण आहे. स्तनाचे लोब्यूल्स किंवा नलिकांमधील पेशीची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर हा कॅन्सर वाढतो. ब्रेस्ट कॅन्सर होण्याची लक्षणं काय आहेत? त्यापासून काय काळजी घ्यावी ? याविषयची माहिती पुण्यातले डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
advertisement

काय आहेत लक्षणं?

स्तनाच्या ठिकाणी एका बाजूला गाठ असल्याचं जाणवणं हे या कॅन्सरचं मुख्य लक्षण आहे. त्याचबरोबर 1. स्तनाचा आकार किंवा आकार बदलणे 2. स्तनामध्ये वेदना न होणारी गाठ आढळणे 3. निप्पलवर/आजूबाजूला लालसरपणा किंवा पुरळ 4. स्तन किंवा काखेत सतत वेदना 5. उलटे स्तनाग्र किंवा त्याच्या आकारात बदल 6. स्तन जागेवर ओलसरपणा किंवा irritation होणे ही या कॅन्सरची लक्षणं आहेत, अशी माहिती भोंडवे यांनी दिली.

advertisement

ब्रेस्ट कॅन्सरचे टप्पे

पहिला टप्पा : यामध्ये कॅन्सरच्या पेशी एका लहान भागात जवळच्या ऊतींमध्ये पसरतात.

दुसरा टप्पा : ट्यूमर 20-50 मिमीच्या दरम्यान असतो आणि काही लिम्फ नोड्स गुंतलेले असतात किंवा 50 मिमी पेक्षा मोठ्या ट्यूमरमध्ये लिम्फ नोडचा सहभाग नसतो.

तिसरा टप्पा: ट्यूमर विस्तीर्ण क्षेत्रामध्ये ५० मिमी पेक्षा मोठा असतो ज्यामध्ये अधिक लिम्फ नोड्स असतात. काही प्रकरणांमध्ये, ट्यूमर अजिबात नसतो. कर्करोग त्वचेवर किंवा छातीवर पसरू शकतो.

advertisement

चौथा टप्पा : कॅन्सर स्तनाच्या पलिकडे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरला आहे.

ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कुणाला?

ब्रेस्ट कॅन्सर होण्याच्या जोखीम घटकाची डॉ. भोंडवे यांनी माहिती दिलीय. 1) मोठे वय 2.धूम्रपान 3.ब्रेस्ट कॅन्सर किंवा सौम्य (कर्करोग नसलेल्या) स्तनाच्या आजाराचा इतिहास.

4. BRCA2, BRCA1 जनुकांमध्ये उत्परिवर्तनाचा वारसा आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. 5. ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही किंवा वयाच्या 30 नंतर त्यांची पहिली गर्भधारणा झाली त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.

advertisement

ब्रेस्ट कॅन्सर प्रतिबंधक टिप्स?

आपले स्तन नेहमी दिसतात त्यापेक्षा वेगळे दिसत असतील त्यामध्ये काही बदल झाला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी मॅमोग्राम टेस्ट करावी. तुमच्या आहारातील हिरव्या भाज्या आणि फळे तुमचे वजन निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.नवीन मातांनी आपल्या बाळाला किमान एक वर्ष स्तनपान करणे योग्य आहे.जास्त प्रमाणात मद्यपान किंवा धूम्रपान करू नका, असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिलाय.

advertisement

ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी त्यामधील उपचारांमध्येही मोठी प्रगती झालीय. त्यामुळे तुम्ही शरिराची योग्य काळजी घेतली तर या कॅन्सरला वेळीच रोखणे शक्य आहे, असं भोंडवे यांनी स्पष्ट केले.

( टीप : या बातमीतील माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
महिलांनो, ‘या’ लक्षणांकडं करु नका दुर्लक्ष, ब्रेस्ट कॅन्सरचा असू शकतो धोका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल