शिमला - हिवाळा सुरू झाला असून अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. त्यात सध्याच्या या डिजिटलच्या युगात मोबाईल, कॉम्प्युटरचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोठ्या प्रमाणात लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यामुळे हिवाळ्यात वापरकर्त्यांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
सामान्य काळात लॅपटॉप आणि मोबाईल वगैरे वापरताना काळजी घ्यावी लागते. मात्र, हिवाळ्यात शरीराचे कार्य करण्याची प्रक्रिया संथ होते त्यामुळे लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर करणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. IGMC चे नेत्रतज्ज्ञ डॉ. रामलाल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जे लोक लॅपटॉप किंवा मोबाईल जास्त वापरतात, अशा लोकांचे हिवाळ्यात डोळे कोरडे पडण्याची समस्या जास्त असते. जे लोक मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवतात, त्यांनी हिवाळ्यात रिकाम्या वेळेत मोबाईल वापरू नये. त्या वेळेत त्यांनी इतर कामावर लक्ष केंद्रित करावे आणि मोबाईल बाजूला ठेवावा. असे केल्याने डोळ्यांवर फारसा ताण पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच जे लोक ऑफिसमध्ये कॉम्प्युटरचा वापर करतात, त्यांनी 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी डोळे बंद करावेत आणि कॉम्प्युटरला आपल्या डोळ्यांपासून दूर ठेवावे. काही वेळ तुम्ही डोळ्यांना आरामही देऊ शकतात. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो. तसेच जर तुम्ही हिवाळ्यात घराबाहेर गेलात तर दिवसातून तीन वेळा डोळे धुणेसुद्धा महत्त्वाचे आहे. तुम्ही डोळे थंड किंवा कोमट पाण्याने धुवावेत, असे ते म्हणाले.
पायलट तरुणीची आत्महत्या, कुटुंबीयांनी प्रियकरावर केले गंभीर आरोप, म्हणाले, तो…
हिवाळ्यात रुग्णालयांमध्ये डोळ्यासंबंधित रुग्णांची संख्या वाढते. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये हा आकडा जास्त राहतो आणि त्यानंतर त्यात थोडी घट होते, असेही डॉ. रामलाल यांनी सांगितले.