पायलट तरुणीची आत्महत्या, कुटुंबीयांनी प्रियकरावर केले गंभीर आरोप, म्हणाले, तो...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
pilot girl death case - आदित्य आणि सृष्टी या दोघांची भेट 2019 मध्ये दिल्लीत व्यावसायिक पायलट परवाना अभ्यासक्रमादरम्यान झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षांपासून सृष्टी ही 27 वर्षीय आदित्य पंडितसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
रजत भट्ट, प्रतिनिधी
गोरखपूर - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. तरुणाईमध्ये आत्महत्येच्या घटनाही वाढल्याचे दिसून येत आहेत. यातच आता आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या एका पायलट तरुणीने आत्महत्या केली. यानंतर या तरुणीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत.
सृष्टी तुली असे या तरुणीचे नाव आहे. ती उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील रहिवासी होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी दोषांनी शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी तिचे वडील विवेक तुली यांनी केली आहे.
advertisement
विवेक तुली म्हणाले की, बालपणापासून तिने पायलट होण्याचे स्वप्न पाहिले होते. तिचे आजोबा, पणजोबा यांच्या वीरगाथांनी ती प्रेरित झाली होती. त्यामुळे अगदी कमी वयात तिने पायलट होऊन दाखवले होते. तिचा प्रियकर आदित्य पंडित हा तिला मानसिक आणि आर्थिक रुपाने त्रास देत होता. सृष्टीला ब्लॅकमेल करुन त्याने पैसे वसूल केले होते. आदित्य पंडित तिच्याकडे नेहमी पैशांची मागणी करायचा. तिला पैशांसाठी त्रास देत होता. मागील अनेक दिवसांपासून हा सर्व प्रकार सुरू होता, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
advertisement
आदित्य आणि सृष्टी या दोघांची भेट 2019 मध्ये दिल्लीत व्यावसायिक पायलट परवाना अभ्यासक्रमादरम्यान झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षांपासून सृष्टी ही 27 वर्षीय आदित्य पंडितसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सृष्टी ही 20 दिवसांपूर्वी आपले घर गोरखपुर येथून मुंबईला गेली होती. तसेच ती आनंदी होती. मात्र, तिने हे पाऊल उचलले नसावे, असा संशयही तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. बुधवारी गोरखपुरमध्ये राजघाटवर पायलट तरुणीवर अंतिम संस्कार करण्यात आले. तिच्या वडिलांनी तिला मुखाग्नी दिला.
advertisement
सृष्टीच्या मोठ्या वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस हा 26 नोव्हेंबरला होता आणि 27 नोव्हेंबरला तिच्या वडिलांचा वाढदिवस होता. त्यामुळे ती यासाठी घरी येण्याची तयारी करत होती. मात्र, त्याआधी ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मृत पायलट तरुणीच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, सध्या मुंबई पोलिसांनी तिचा प्रियकर आदित्य पंडितला अटक केली आहे.
Location :
Gorakhpur,Uttar Pradesh
First Published :
November 29, 2024 5:01 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पायलट तरुणीची आत्महत्या, कुटुंबीयांनी प्रियकरावर केले गंभीर आरोप, म्हणाले, तो...