मासिक पाळी ही महिलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण, अनेकींसाठी ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी वेळेत येत नाही. पाळी नियमित आली नाही की, जेव्हा सुरु होते तेव्हा खूप वेदना आणि त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी धण्याचं पाणी हा एक परिपूर्ण उपाय आहे. मासिक पाळीतील अनियमितता, मासिक पाळीतील दुखणं आणि संप्रेरकांचं संतुलन यामुळे शक्य होतं. धण्याचं पाणी प्यायल्यामुळे, महिनाभरातच तुम्हाला फरक दिसेल.
advertisement
महिलांच्या या समस्यांवर डॉ.शिल्पा अरोरा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओत, डॉ. शिल्पा यांनी धण्याचं पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. धण्याचं पाणी नियमित प्यायल्यानं, मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला धणे आणि पाणी या दोनच घटकांची गरज आहे. मासिक पाळी नियमित करण्यासोबतच पीसीओडीची समस्याही यामुळे कमी होते.
धण्याचं पाणी
धण्याचं पाणी बनवण्यासाठी एक चमचा धणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी एका पातेल्यात धणे आणि पाणी टाकून चांगलं उकळून घ्या. ते निम्मं झाल्यावर गाळून घ्या. हे पाणी कोमट असताना रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. ज्या महिला किंवा मुलींना मासिक पाळी वेळेवर येत नाही ते दिवसातून दोन ते तीन वेळा हे पाणी पिऊ शकतात,असं तज्ज्ञ सांगतात.
धण्याचं पाणी पिण्याचे फायदे
संप्रेरकांचं संतुलन: इस्ट्रोजेन हार्मोन्स संतुलित करण्यासाठी धणे उपयुक्त ठरतात. यामुळे मासिक पाळीदरम्यान येणारे मूड स्विंग, चिडचिड किंवा थकवा यासारख्या मासिक पाळीच्या समस्या कमी होतात.
शरीराला डिटॉक्स करणं शक्य: धण्यांमुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. हे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे चयापचयाचा वेग वाढवण्यासाठीही मदत होते.
रक्तस्त्राव नियंत्रित करा: मासिक पाळीत खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल तर, हे पाणी प्या, रक्तस्त्राव नियंत्रित ठेवण्यास यामुळे मदत होते.
Weight Loss : बारीक होण्यासाठीच्या सहा टिप्स, सात दिवसात दिसेल फरक
पेटके कमी करण्यासाठी मदत: धण्यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म मासिक पाळीत येणारे पेटके आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.
हे लक्षात ठेवा -
- धणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, सकाळी गाळून प्या.
- धणे पाण्यात उकळून त्यात मध आणि लिंबू घालून चहासारखं बनवू शकता.
- गरम पाण्यात धणे पूड टाकून पिऊ शकता.
- जास्त प्रमाणात पिणं टाळा, कारण यामुळे कमी रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
