TRENDING:

Hair Growth: केसांच्या वाढीसाठी ही पथ्यं पाळा, केसांची गुणवत्ता सुधारेल

Last Updated:

केस लांब, घट्ट आणि मजबूत असावेत असं प्रत्येकाला वाटतं. पण यासाठी तुमचा आहार कसा आहे, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : केस लांब, घट्ट आणि मजबूत असावेत असं प्रत्येकाला वाटतं. पण यासाठी तुमचा आहार कसा आहे, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. खाण्याच्या योग्य सवयी आणि योग्य पोषण नसल्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो. कारण तुमच्या केसांचं आरोग्य थेट तुमच्या आहारावर अवलंबून आहे.
News18
News18
advertisement

पाहूयात केसांच्या चांगल्या वाढीसाठी पोषक घटक

1. अंडी

अंडी हा प्रथिनं आणि बायोटिनचा उत्कृष्ट स्रोत आहे. प्रथिनं केसांचा मुख्य घटक केराटिन तयार करण्यास मदत करतात, तर बायोटिन केसांना मजबूत आणि दाट करतात.

2. पालक

पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं. हे पोषक घटक टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि केसांच्या मुळांचं पोषण करण्यासाठी उपयुक्त आहेत. याशिवाय केसगळतीपासूनही संरक्षण मिळतं.

advertisement

Nutmeg Powder : एक चमचा जायफळ पावडर दुधात मिसळून प्या, पोटाच्या तक्रारी होतील दूर, तब्येत राहिल तंदुरुस्त

3. गाजर

गाजरांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं, जे टाळूमध्ये सेबमचं उत्पादन नियंत्रित करतं. यामुळे केसांना आर्द्रता मिळते आणि कोंडा टाळण्यास मदत करते.

4. मासे

सॅल्मन, मॅकेरल आणि सार्डिन यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन डी आढळतात, ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि त्यांची वाढ होते.

advertisement

5. सुका मेवा आणि बिया

बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि जवसामध्ये व्हिटॅमिन ई, जस्त हे घटक असतात, जे केसांचे पोषण करतात आणि नुकसान कमी करतात.

Digestion tips: पोट साफ होत नसेल तर या टिप्स नक्की वापरून पहा, पोट होईल स्वच्छ, तब्येत राहिल ठणठणीत

6. दही

प्रथिनांसह, दह्यामध्ये व्हिटॅमिन बी 5 देखील असते, जे केस तुटण्यापासून प्रतिबंध आणि टाळू निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. याचा आहारात समावेश केला तर केसांची वाढ वेगवान होऊ शकते.

advertisement

7. रताळं

रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन आढळतं. जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होतं. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि त्यांची वाढ चांगली होते.

8. बीन्स

बीन्समध्ये प्रथिनं, लोह, बायोटिन आणि जस्त भरपूर प्रमाणात असतात. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळणं कमी होतं.

9. पेरू

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं, जे केसांच्या मजबुतीसाठी आणि वाढीसाठी खूप महत्वाचं आहे.

advertisement

10. हिरवी मिरची

हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन असतं, ज्यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढतं आणि केसांची वाढ गतिमान होते.

या टिप्स लक्षात ठेवा :

या सर्व पदार्थांसोबतच दिवसभर पुरेसं पाणी प्या.

रक्ताभिसरण वाढवण्यासाठी टाळूला नियमित मालिश करा.

केमिकल असलेली केसांची उत्पादनं वापरणं टाळा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Growth: केसांच्या वाढीसाठी ही पथ्यं पाळा, केसांची गुणवत्ता सुधारेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल