खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतल्या बदलांमुळे पोटात गॅस होण्याची, ॲसिडिटी होण्याचं प्रमाण वाढतं. काहींना नाश्ता न केल्यानं पोटात गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ लागतो, तर काहींना चहा-कॉफी प्यायल्यानं गॅसची समस्या होते.
गॅसेस आणि ॲसिडिटी का होते ?
खाण्याच्या चुकीच्या सवयी: मसालेदार, तळलेले किंवा फास्ट फूड खाणं.
advertisement
खाण्यात अनियमितता : वेळेवर न खाणे किंवा अन्न नीट न चावणं.
तणाव आणि चिंता: तणावाचा पोटाच्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो.
पाण्याची कमतरता : पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यानं पचनसंस्था नीट कार्य करत नाही.
बसण्याची सवय : शारीरिक हालचालींच्या अभावामुळेही गॅसची समस्या निर्माण होते.
Soaked Dry Fruits : सुका मेवा भिजवून खाण्याचे फायदे, शरीरासाठी पौष्टिकतेचा खजिना
गॅसपासून आराम मिळवण्यासाठी या सवयी बदला.
1. अन्न नीट खा
अन्न व्यवस्थित चघळल्यानं पचनसंस्थेला अन्नाचे तुकडे करण्यास मदत होते. पटकन खाण्याच्या सवयीमुळे
पोटात गॅस तयार होण्याची शक्यता वाढते.
2. फायबरयुक्त पदार्थ खा
तुमच्या आहारात फळं, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमचं पचन सुधारण्यास मदत होते आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध करते.
3. पाणी नीट प्या
दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्या. पाणी पचनास मदत करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळा.
4. जंक फूड टाळा
गॅसची समस्या असेल तर तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड तुमच्या आहारातून काढून टाका. यामुळे पोटात गॅस आणि ॲसिडिटीची समस्या वाढू शकते.
Raw Milk Benefits : चेहऱ्यासाठी करा कच्च्या दुधाचा वापर, निस्तेज त्वचेसाठी प्रभावी नैसर्गिक उपाय
5. अन्न वेळेवर खा
जेवणाची वेळ ठरवा. रात्री उशिरा अन्न खाल्ल्यानं गॅस आणि ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. त्यामुळे जेवणाच्या नियमित वेळा पाळा.
6. व्यायाम करा
दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम करा. चालणं, योगासनं किंवा हलकं स्ट्रेचिंग पचनसंस्था सुधारण्यास मदत करते.
7. तणाव कमी करा
ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि खोल श्वास घेण्याच्या तंत्रांचा सराव करा. दीर्घ श्वास घेतल्यानं तणाव कमी होण्यास मदत होते.
गॅसपासून आराम मिळवण्यासाठी आणखी काही घरगुती उपाय:
ओवा आणि काळं मीठ : गॅसपासून आराम मिळवण्यासाठी काळ्या मीठात ओवा मिसळून खा.
हिंगाचं पाणी : एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्यायल्यानं पोटातील गॅस कमी होतो.
पुदिना : पुदिन्याचा चहा किंवा पुदिन्याचा रस पचनक्रिया सुधारतो.
लिंबू आणि गरम पाणी : सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यानं ॲसिडीटी आणि गॅसपासून आराम मिळतो.
