रांची : काही जणांना अनेक वेळा छातीत जळजळ होते. तर कधी कधी रात्री झोपतानाही छाती दुखते. अशा लोकांना हृदयाची समस्या आहे, अशी शंका त्यांना येते. मात्र, जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांना कळते की त्यांना हृदयाची समस्या नाही तर गॅसची समस्या झाली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरातील काही लक्षणांकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
झारखंडची राजधानी रांची येथील रिम्समधील डॉ. जेके मित्र (मेडिसिन विभागाचे एचओडी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव) यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, काही वेळा छातीत दुखत असल्याने लोकं हृदयरोगतज्ज्ञांकडे जातात आणि अशाप्रकारे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवतात. कारण त्याठिकाणी गेल्यावर गॅसचा त्रास असल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे अशा परिस्थितीत हृदय आणि वायू या दोन्ही समस्यांची लक्षणे काय आहेत, ही माहिती असणे आवश्यक आहे.
दोघांची लक्षणे वेगळी -
डॉ. जेके मित्र यांनी सांगिलते की, अनेकदा लोकांच्या छातीत जळजळ होते, किंवा छाती दुखते. अशावेळी त्यांना वाटते की, हृदयाची समस्या असेल. मात्र, प्रत्येकवेळी असे होत नाही. जेव्हा तुम्हाला गॅसची समस्या होते, तेव्हा याचा प्रभाव तुम्हाला तुमच्या पोटावरही पाहायला मिळेल. तुमचे पोट भरलेले वाटेल आणि तुम्हाला खावेसे वाटणार नाही.
शनि जयंतीचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा, राशीनुसार करा या वस्तूंचे दान, मग पाहा फायदा
जितकेही चविष्ट जेवण असेल, मग तुमचे कितीही आवडीचे असू द्या, ते खायला तुमचे मन लागणार नाही. पोटातील गॅसमुळे पोट भरलेले वाटते. त्यामुळे तुम्हाला जेवण करावेसे वाटत नाही आणि हाच गॅस जेव्हा थोडा वर जातो, तेव्हा तुमच्या छातील जळजळ होते किंवा तुम्हाला छातीमध्ये त्रास होतो.
तर हृदयाच्या समस्याचा विचार केला असता याची लक्षणे वेगळी आहेत. यामध्ये सर्वात आधी तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होईल. रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्यावेळी श्वास घेताना त्रास होत आहे, असे जाणवेल. मात्र, गॅसच्या समस्येत असे होणार नाही. त्यासोबतच ज्यांना हृदयाचा त्रास असेल तर थोडे अंतर चालल्यावरसुद्धा त्रास होईल. पायऱ्या चढायलाही त्यांना त्रास होईल. याशिवाय, अशा लोकांना अनेकदा जबडा आणि डाव्या खांद्यामध्ये वेदना होतात. जर ते थोडे अधिक बोलले तर त्यांना धडधडू लागते. मात्र, गॅसच्या समस्येत असा प्रकार दिसत नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
आई-वडील वारले, दोन वेळच्या जेवणासाठी वेचला कचरा, आज बनली यूरोपियन रेस्टॉरंटची हेड शेफ
नेमकं काय करावं -
डॉ. जे के मित्र यांनी सांगितले की, छातीत जळजळ किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. छातीची समस्या भविष्यात मोठी समस्या निर्माण करू शकते. तसेच हृदय निरोगी ठेवण्यासाठी, लोकांनी दररोज किमान एक तास चालणे आवश्यक आहे. तसेच जेवणात कमीतकमी तेल आणि मसाल्यांचा वापर केला पाहिजे आणि दररोज 20 ते 30 मिनिटे योगाभ्यास करावा, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
सूचना : ही माहिती दिलेली माहिती, आरोग्यविषयक सल्ला हा तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच या गोष्टी फॉलो करा. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.