आई-वडील वारले, दोन वेळच्या जेवणासाठी वेचला कचरा, आज बनली यूरोपियन रेस्टॉरंटची हेड शेफ

Last Updated:

तिने पुढे सांगितले की, झोपडपट्टीत राहणारी महिला सर्व मुलांना सकाळी 4 वाजता उठवायची आणि फ्रेंड कॉलनीत रस्त्यांवर कचरा विकण्यास पाठवायची. या बदल्यात आम्हाला जेवण मिळत होते.

लीलिमा ख़ान
लीलिमा ख़ान
आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी
दिल्ली : तुम्ही आतापर्यंत अनेक प्रेरणादायी कहाण्या ऐकल्या असतील, वाचल्या असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा तरुणीची कहाणी सांगणार आहोत, जी 4 वर्षांची असतानाच तिच्या आई-वडिलाचं निधन झालं होतं. यानंतर या धक्क्यामुळे मोठ्या बहिणीने आत्महत्या केली. घरात एकाच वेळी 3 लोकांच्या मृत्यूमुळे मोठा भाऊ नैराश्यात गेला आणि नशेच्या आहारी गेला. मात्र, तरीही या तरुणीने हिम्मत न राहता आपल्या आयुष्याचा प्रवास सुरू ठेवला.
advertisement
दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून दिल्लीतील रस्त्यांवर कचरा वेचू लागली आणि आपल्या मेहनतीच्या बळावर, जिद्दीच्या बळावर शिक्षण सुरू ठेवले. हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र, तेदेखील अर्ध्यात सोडावे लागले. मात्र, आज ही तरुणी दिल्लीत एका अत्यंत प्रसिद्ध अशा यूरोपियन रेस्टॉरंटची हेड शेफ आहे.
लीलिमा ख़ान असे या तरुणीचे नाव आहे. ती डियर डोना रेस्टोरंटची हेड शेफ आहे. लोकल18 शी बोलताना लीलिमाने आपल्या आयुष्याताली संघर्षाची कहाणी सांगितली. तिने सांगितले की, तिचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. तेव्हा तिचे वय फक्त 4 वर्षे होते. मात्र, त्याचवेळी तिच्या आई वडिलांचे निधन झाले. ती आपल्या दोन मोठ्या भाऊ आणि बहिणीसह राहू लागली. मात्र, तिच्या बहिणीनेही आत्महत्या केली. एकापाठोपाठ 3 जणांच्या मृत्यूनंतर याचा परिणाम विवाहित भावावर झाला. त्या नैराश्याने ग्रासले आणि तो नशेच्या आहारी गेला.
advertisement
लिलिमा पुढे म्हणाली की, नशेच्या आहारी गेलेल्या भावाने घर विकून टाकले. यानंतर चोरीच्या आरोपात त्याला तुरुंगात टाकण्यात आले. त्यामुळे लिलिमा आणि तिचा 2 वर्षांचा लहान भाऊ एकटे पडले. काही दिवसांनी तिची काकू येऊन लहान भावाला सोबत घेऊन गेली. यानंतर ती एकटी पडली. घरात कुणीच नसल्याने झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेने तिला आश्रय दिला. त्याठिकाणी इतर अनेक मुलेही राहत होती.
advertisement
सकाळी 4 वाजेपासून कचरा वेचायची -
तिने पुढे सांगितले की, झोपडपट्टीत राहणारी महिला सर्व मुलांना सकाळी 4 वाजता उठवायची आणि फ्रेंड कॉलनीत रस्त्यांवर कचरा विकण्यास पाठवायची. या बदल्यात आम्हाला जेवण मिळत होते. मधल्या काळात भूक लागत असल्याने अनेकदा आम्हाला डस्टबिनमदून जेवण काढून खावे लागत होते. परिस्थिती अशी होती की अनेकदा रेड लाइट परिसरातही भीक मागावी लागत होती. पण, अशा सर्व परिस्थितीत एक सकारात्मक वळण तिच्या आयुष्याने घेतले.
advertisement
रस्त्यावरील मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या चेतना या एनजीओचे कार्यकर्ते प्रमोद यांच्याशी लीलिमा हिने भेट घेतली. यानंतर मग ती चित्तरंजन पार्कमधील एक अनाथालय, उदयन केअर याठिकाणी आली. याठिकाणी शिक्षणाची सुविधा होती. सर्व काही ठिक सुरू असताना अचानक तिची मावशी त्याठिकाणी आली आणि तिला तेथून घेऊन गेली. मात्र, तेथील वातावरण तिला आवडले नाही. मावशीच्या घरी तिला मारहाणही केली जात होती. त्यामुळे पुन्हा एकदा लीलिमा तिथून निघून गेली आणि यावेळी ती काश्मिरी गेट येथे असलेल्या किलकारी रेनबो होममध्ये पोहोचली. याठिकाणी तिने सुमारे 18 वर्षे येथे वास्तव्य केले आणि तिचे सर्व शिक्षण येथे पूर्ण केले.
advertisement
अशा प्रकारे बनली हेड शेफ -
लोकल18 शी बोलताना लीलिमाने सांगितले की, किलकारी रेनबो होम याठिकाणी राहत असताना तिला Creative Services Support Group (CSSG) याबाबत माहिती मिळाली. हा ग्रुप 18 वर्षांपेक्षा जास्त मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे या ग्रुपच्या मदतीने तिला लोधी रोडवरील एका हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर तिने अनेक हॉटेलमध्ये नोकरी केली. बराच काळ अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये काम केल्यानंतर मला डिअर डोना युरोपियन रेस्टॉरंटमध्ये हेड शेफची नोकरी मिळाली. माझा पहिला पगार हा फक्त 5000 रुपये होता. आज मी महिन्याला ६५ हजार रुपये कमवत आहे आहे, अशी माहिती तिने दिली. तिचा हा संघर्षमय प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या/करिअर/
आई-वडील वारले, दोन वेळच्या जेवणासाठी वेचला कचरा, आज बनली यूरोपियन रेस्टॉरंटची हेड शेफ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement