खरंतर आपण लहान मुलांना काजळ हे घालायला नाही पाहिजे कारण की त्यांचे डोळे अतिशय नाजूक असतात. आणि ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे की लहान मुलांच्या डोळ्यात काजळ घातल्यामुळे त्यांचे डोळे मोठे होतात. काजळ घातल्यामुळे डोळे मोठे होत नाहीत हे सर्व समज चुकीचे आहेत. डोळे मोठे होणार हे सर्वस्वी आई-वडिलांवरती असतं किंवा अनुवंशिक असते. जर तुमच्या आई-वडिलांचे डोळे मोठे असतील तरच तुमच्या डोळे मोठी होतात, असं डॉक्टर वैशाली उणे सांगतात.
advertisement
काजळ घातलं किंवा इतर कुठली गोष्ट केली म्हणून डोळे मोठी होत नाहीत. आणि लहान मुलांच्या डोळ्यांना काजळ लावू नये. लहान मुलांचे डोळे अतिशय नाजूक असतात आणि आपण जर त्यांना काजळ लावलं तर त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची देखील शक्यता असते. आपण काजळ लहान मुलांना बोटांना लावतो जेव्हा आपण त्यांना काजळ लावतो आपलं बोट जर त्यांच्या डोळ्यात चुकून दुसरीकडे कुठे लागले तर त्यामुळे त्यांना इजा होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
तसंच तुम्ही काजळ कोणतं वापरतात ते कशा कंडिशनमध्ये तयार केलेलं आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. काजळ लावायचं असेल तर ते तुम्ही चांगलं काजळ लावावं किंवा तुम्ही घरी तयार केलेले काजळ हे लहान मुलांना लावावे. पण आम्ही सर्व नेत्ररोग तज्ज्ञ आई-वडिलांनाही सांगतो की तुम्ही तुमच्या लहान मुलांना काजळ लावू नये. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल काजळ लावलं म्हणून आपल्या बाळाला नजर लागत नाही तर तुम्ही त्यांच्या कानाच्या मागे काळा टीका लावू शकता पण डोळ्यांना काजळ लावू नये असा माझा सर्वांना सल्ला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.