ट्रस्टची स्थापना आणि कार्य
वडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी 2007 साली कै. डॉ. भाऊसाहेब सहिंद्रकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ट्रस्टच्या माध्यमातून आजवर आयोजित हजारो आरोग्य शिबिरांतून तीन लाखांहून अधिक गरजूंना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाला आहे.
Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? हे सोपे उपाय ठरतील उपयुक्त
मोफत तपासण्या आणि उपचार
advertisement
शिबिरांमध्ये नेत्र, नाक, कान, घसा, स्त्रीरोग, त्वचारोग, बालरोग, दंतरोग, मूळव्याध, रक्तदाब, ईसीजी, बोन डेन्सिटी यांसारख्या तपासण्या केल्या जातात. मोफत चष्मे वाटप, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, विविध आजारांवरील लसीकरण तसेच एचआयव्ही जनजागृती मोहिमा राबवल्या जातात.
वारकऱ्यांसाठी सेवा
दरवर्षी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पुण्यात मुक्कामी आलेल्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सोय केली जाते. तसेच मूकबधिर, अनाथ, अपंग, गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या संस्थांना धान्य, कपडे, पुस्तके आणि आर्थिक मदत पुरवली जाते. अपंग मुलांना दत्तक पालकत्वही दिले जाते.
विधवा महिलांसाठी धान्य किट्स
गेल्या 6 वर्षांपासून ट्रस्टतर्फे प्रत्येक महिन्याच्या 5तारखेला गरजू विधवा महिलांना धान्याचे किट्स दिले जातात. तसेच आर्थिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांची फी भरून त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत केली जाते. समाजासाठी नि:स्वार्थी सेवा देणाऱ्या डॉ. प्रकाश सहिंद्रकर यांना ग्रामीण आणि झोपडपट्टीतील आरोग्यसेवेबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे.





