उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी देशी ड्रिंक्सचा करा समावेश
लोकल 18 सोबतच्या खास बातचीतमध्ये आहारतज्ज्ञ ममता पांडे यांनी सांगितलं की, उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी लिंबू पाणी, बेल शरबत, कैरीचं पन्हं, नारळ पाणी आणि मिठाचं पाणी हे सर्वोत्तम पर्याय आहेत. हे केवळ शरीराला थंडावा देत नाहीत, तर त्यामध्ये असलेले नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि ताजेतवाने ठेवतात.
advertisement
स्पोर्ट्स ड्रिंक्स कोणासाठी आवश्यक आणि कोणासाठी हानिकारक?
तज्ञांच्या मते, जे लोक जास्त व्यायाम करतात, जसे की 2-3 तास वर्कआउट किंवा ॲथलेटिक ॲक्टिव्हिटी करतात, त्यांच्यासाठी स्पोर्ट्स ड्रिंक्स आवश्यक असू शकतात, कारण या काळात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारखी आवश्यक खनिजे घामाच्या रूपात शरीरातून बाहेर पडतात. अशा परिस्थितीत स्पोर्ट्स ड्रिंक्स शरीराला ही आवश्यक तत्वं पुन्हा पुरवतात, पण जे लोक हलका व्यायाम किंवा कमी व्यायाम करतात त्यांना स्पोर्ट्स ड्रिंक्सची गरज नसते. त्या म्हणाल्या की, आजकल फिटनेसच्या नावाखाली गरज नसताना एनर्जी ड्रिंक्स घेणं एक ट्रेंड बनला आहे, जो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
सामान्य डिहायड्रेशनसाठी घरगुती ड्रिंक्स आहेत सर्वोत्तम पर्याय
सामान्य डिहायड्रेशनसाठी तज्ञांनी सल्ला दिला आहे की, पाणी, मीठ-साखरेचं पाणी किंवा सत्तू, कैरीचं पन्हं किंवा नारळ पाणी यांसारखी कोणतीही घरगुती ड्रिंक्स पिणं अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि बाजारात मिळणाऱ्या अनावश्यक पेयांऐवजी आपल्या पारंपरिक आणि पौष्टिक देशी पेयांना प्राधान्य द्या.
हे ही वाचा : सर्दी-खोकला, वात-पित्त अन् त्वचारोग... पळवून लावते 'हे' जंगली झाड; फक्त 5ml काढा घ्या अन् ठणठणीत व्हा!
हे ही वाचा : ‘मोहब्बत का शरबत’ने मिळेल उन्हाळ्यात शरीराला थंडावा, पण पिणं चांगलं की वाईट?