पावसाळ्यात ताक पिण्याचे फायदे
ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक असल्याने त्यात लॅक्टोबॅसिलस सारखे चांगले जंतू असतात. हे पचनतंत्र सुधारतात आणि बद्धकोष्ठता, अपचनासारख्या तक्रारी दूर करतात. दमट हवामानात शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते. ताक हे शरीरात योग्य प्रमाणात द्रव टिकवून ठेवण्यास मदत करते. ताक हे थंड प्रभाव देणारे असल्यामुळे ते शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवते, जी पावसाळ्यात चटकन वाढू शकते. ताकातील बॅक्टेरिया आणि अन्नघटक हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात, असं आरोग्य तज्ज्ञ स्नेहा परांजपे सांगतात.
advertisement
Ghee vs. Butter : तूप की बटर, तुमच्या आरोग्यासाठी काय चांगलं?
पावसाळ्यात ताक पिणे कधी टाळावे
दमट हवामानात ताक लवकर आंबट होते आणि अशा स्थितीत ते पिऊन पोट बिघडण्याचा धोका असतो. ताक थंड प्रवृत्तीचं असल्यामुळे आधीपासूनच सर्दी-खोकल्याची तक्रार असल्यास ते टाळावं.
रात्रीच्या वेळी ताक पिणे थंडी वाढवू शकते, त्यामुळे सकाळ किंवा दुपारीच त्याचे सेवन उत्तम. पावसाळ्यात ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, पण योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य प्रकारे सेवन केल्यास. विशेषतः जर तुम्हाला पचनाची तक्रार नसेल, सर्दी-खोकला नसेल तर तुम्ही नक्कीच ताकाचा आहारात समावेश करू शकता, असं आरोग्य तज्ज्ञ स्नेहा परांजपे सांगतात.