रायपुर : अनेकांना वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, जास्त उष्णता, जास्त घाम येणे, अशी लक्षणे दिसून येतात. नेमकी यामागे काय कारणे आहेत, ही कोणत्या आजाराची लक्षणे तर नाहीत ना, याचबाबत आपण जाणून घेणार आहोत. रायपुर येथील आहारतज्ञ डॉ. सारिका श्रीवास्तव यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी मधुमेहाचे प्रकार आणि नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबतही सल्ला दिला.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्या म्हणाल्या की, आपण आपल्या खाण्याच्या सवयींबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. डायबिटीज म्हणजे मधुमेह एक गंभीर आजार आहे. आजही समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. यामुळे रक्तातील ग्लूकोजची पातळी अनियंत्रित होते. यामध्ये शरीराची इन्सुलिन तयार करण्याची क्षमता प्रभावित होते आणि ग्लुकोजची पातळी वाढते. आपल्या खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली हे याचे मुख्य कारण आहे.
मधुमेहाचे प्रकार -
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, खराब जीवनशैलीमुळे अनेकांना मधुमेहाचा त्रास होत आहे. या मधुमेहाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार टायप 1 डायबिटीज आहे. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे किंवा शरीरात इन्सुलिन तयार होत नसल्यामुळे हा होतो. अशावेळी इन्सुलिन बाहेरुन दिले जाते. दुसरा प्रकार टाइप 2 डायबिटीज आहे. यामध्ये इन्सुलिन तयार होते, मात्र, त्याचे प्रमाण कमी असल्याने साखरेची पातळी खूप वाढते. तर तिसरा प्रकार म्हणजे गर्भावस्थेतील मधुमेह आहे. हा लहान मुलांमध्ये दिसून येतो.
शेतकऱ्यानं तयार केली अनोखी बाइक, 10 रुपयात चालते तब्बल 50 किमी, लोकं येतायेत विचारायला..
मधुमेहाची लक्षणे आणि उपाय -
मधुमेह हा आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहे. आपल्या खाण्याच्या सवयींशी संबंधित हा आजार आहे. साखर खाल्ल्याने मधुमेह होत नाही. मात्र, जर आपली जीवनशैली बिघडली किंवा खाण्याच्या सवयी नीट नसल्या तर साखरेची पातळी नक्कीच वाढू शकते. जेव्हा तुम्हाला साखरेचा किंवा मधुमेहाचा त्रास होत असेल, तेव्हा वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, जास्त उष्णता, जास्त घाम येणे ही लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येतात. तसेच युरिन इन्फेक्शन वारंवार होत असेल तर लगेच साखरेची पातळी तपासावी, असा महत्त्वाचा सल्लाही आहारतज्ञ डॉ. सारिका श्रीवास्तव यांनी लोकल18 शी बोलताना दिला.
सूचना - या बातमीत दिलेल्या माहिती ही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चेच्या आधारावर आहे. ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही औषधी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या बातमीतील मतांशी लोकल18 मराठी सहमत नसून जबाबदार नसेल.
