पाहूयात दृष्टी कशी चांगली ठेवायची हे सांगणाऱ्या टिप्स
1. गाजर
डोळ्यांसाठी गाजर खूप फायदेशीर मानलं जातं. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळतं, डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी याची मदत होते. गाजराचा रस किंवा गाजर कच्चं खाल्ल्यानं डोळ्यांचा थकवा दूर होतो आणि दृष्टी सुधारते.
Cracked heels : टाचांच्या भेगांसाठी घरगुती उपाय, घरातील या 10 गोष्टींचा करा वापर, भेगा भरुन येतील
advertisement
2. बदाम
बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे मॅक्युलर डिजेनेरेशन (वय-संबंधित डोळ्याचे विकार) रोखण्यासाठी देखील उपयुक्त आहे. रोज 4-5 भिजवलेले बदाम खाणं डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं.
3. हिरव्या पालेभाज्या
पालक, मेथी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे पोषक घटक डोळ्यांचे स्नायू मजबूत करतात आणि अतिनील किरणांपासून डोळ्यांचं संरक्षण करतात.
Rice Toner : तांदुळाचं पाणी - चेहऱ्याच्या त्वचेसाठी सर्वोत्तम उपाय, घरीही बनवू शकता राईस टोनर
4. आवळा
आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे, डोळ्यांच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. आवळा कच्चा खाऊ शकतो किंवा त्याचा रस पिऊ शकतो.
5. मासे
ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स समृद्ध असलेले मासे, विशेषत: सॅल्मन आणि ट्यूना हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान आहेत. यामुळे ड्राय आय सिंड्रोम आणि डोळ्यांच्या इतर समस्या टाळता येतात. मासे खात नसाल तर तुम्ही जवस आणि चिया सीड्स खाऊ शकता.
हे लक्षात ठेवा :
- पुरेशी झोप घ्या आणि डोळ्यांना विश्रांती द्या.
- दररोज 20-20-20 नियमांचं पालन करा. दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर पहा.
- आपले डोळे नियमितपणे तपासा.
- हानिकारक अतिनील किरणांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सूर्यप्रकाशात सनग्लासेस घाला.
- डोळे हा आपल्या शरीराचा खजिना आहे. त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. तुमच्या दिनचर्येत या 5 गोष्टींचा समावेश करा आणि तुमची दृष्टी दीर्घकाळ निरोगी ठेवा.